CoronaVirus in Buldhana : आणखी १०५ पॉझिटिव्ह; जानेफळमधील डॉक्टरचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 11:32 AM2020-08-29T11:32:41+5:302020-08-29T11:32:48+5:30
कोरोना बाधीतांची संख्या झपाट्याने वाढत असून शुक्रवारी तब्बल १०५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा/जानेफळ: जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या झपाट्याने वाढत असून शुक्रवारी तब्बल १०५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दरम्यान, मेहकर तालुक्यातील जानेफळ येथील एका डॉक्टरचा कोरोनामुळे २८ आॅगस्ट रोजी मृत्यू झाला.
कोरोनाची लागन झाल्याचा संशय आल्याने जानेफळ येथील बालरोग तज्ज्ञ हे औरंगाबाद येथे तपासणीसाठी पाच आॅगस्ट रोजी गेले होते. दरम्यान, शुक्रवारी सकाली त्यांचा मृत्यू झाला. तब्बल २३ दिवस कोरोनाशी त्यांनी दिलेली झुंज अपयशी ठरली.
दरम्यान, त्यांच्या रुग्णालयात काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने जानेफळ येथील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने संबंधीत डॉक्टर स्वत:हून औरंगाबाद येथे उपचारासाठी गेले होते. मात्र त्यांचा २८ आॅगस्टला मृत्यू झाला.
जिल्ह्यातील संदिग्ध रुग्णांचे शुक्रवारी प्रयोगशाळेत आणि रॅपीड टेस्टमध्ये तपासण्यात आलेल्या ६४१ अहवालांपैकी ५३६ अहवाल निगेटीव्ह आले तर १०५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
यामध्ये खामगावातील २२, अटाळी, निमखेड सातगांव भुसारी किन्ही सवडद, कारखेड, दहिगाव, सोमठाणा येथे प्रत्येकी एक, चांधईत दोन, चिखलीत सहा, सोयंदेव १, उमरद २, किनगांव राजा २, वाघाळा २, सिं. राजा १, दे. मही१, धोत्रा नंदई १, दे. राजा ३, बुलडाणा १६, कासारखेड १, सव १, जागदरी १, जायगाव ४, बरटाळा १, जानेफळ १, डोणगांव १३, मेहकर २, मलकापूर ३, ज. जामोद ३, शेगाव, भोनगाव, माटरगाव प्रत्येकी एक, नांदुरा ३, खेडी २, वडाळा (जि. जालना) १ या प्रमाणे १०५ जण शुक्रवारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.