CoronaVirus in Buldhana : आणखी १२१ पॉझिटिव्ह; ४४६ ॲक्टीव्ह रूग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 10:44 AM2020-10-18T10:44:07+5:302020-10-18T10:44:15+5:30
CoronaVirus in Buldhana : ४१४ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले असून १२१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: दोन दिवसापासून कोरोनाच्या चाचण्यांचा वेग वाढविण्यात आला असून शनिवारी तपासणीसाठी पाठविण्यात आलेले स्वॅब आणि रॅपीड टेस्टमध्ये तपासण्यात आलेल्या ५३५ संदिग्धांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ४१४ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले असून १२१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
दरम्यान, पाॅझिटिव्ह आलेल्यांमध्ये गौलखेड एक, कायगाव एक, कठोरा एक, दहीगाव एक, बुलडाणा चार, साखळी बुद्रूक १, नांद्राकोळी एक, वालसावंगी एक, चौथा एक, धाड एक, चिखली सहा, हिवरा गडलिंग एक, हातणी दोन, देऊळगाव राजा १४, देऊळगाव मही एक, नायगाव एक, पोखरी एक, पाडळी एक, हिवरा आश्रम दोन, खंडाळा एक, उकळी एक, बाभुळखेड दोन, लव्हाळा एक, आरेगाव एक, मेहकर ११, दुसरबीड एक, निमगाव वायाळ सात, शेलगाव राऊत एक, साखरखेर्डा चार, सिंदखेड राजा एक, मलकापूर आठ, उमाळी एक, एकलारा बानोदा एक, तळणी दोन, बोराखेडी दोन, लोणार दोन, सुलतानपूर एक, किन्ही एक, पिंपळखुटा दोन, जळगाव जामोद चार, खामगाव सहा, टेंभुर्णा चार, पिंपळखुटा धांडे दोन, घोटा एक, पोटळी एक, जळगाव जिल्ह्यातील वाल्हेतील एक, अकोला जिल्ह्यातील काजेगाव येथील एक, भोकरदनमधील एकाचा समावेश आहे.
४२ जणांची कोरोनावर मात
शनिवारी ४२ जणांनी कोरोनावर मात केली. यामध्ये लोणार कावीड सेंटरमधील १२, मलकापूर दोन, नांदुरा दोन, शेगाव एक, देऊळगाव राजा एक, बुलडाणा १९, मोताळा एक आणि चिखली येथील चार जणांचा समावेश आहे. दरम्यान ३६००७ संदिग्धांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर ७,८६५ कोरोनाबाधीतांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
४४६ ॲक्टीव्ह रुग्ण
तपासणी करण्यात आलेल्या ४३३ संदिग्धांचे अहवाल अद्यापही प्रलंबीत असून रुग्णालयामध्ये सध्या ४४६ जणांवर उपचार करण्यात येत आहेत. ११३ जणांचा आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली.