CoronaVirus in Buldhana : आणखी २२ ‘पॉझिटिव्ह; एकूण रुग्ण संख्या ३००
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 10:59 AM2020-07-06T10:59:24+5:302020-07-06T10:59:33+5:30
रविवारी जिल्ह्यात उपाचर सुरू असलेल्या कोरोना बाधितांची संख्या ही १११ वर पोहोचली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: कोरोना संसर्गाच्या रुग्णांनी जिल्ह्यात त्रिशतक गाठले असून चार बाधीतांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे रविवारी जिल्ह्यात उपाचर सुरू असलेल्या कोरोना बाधितांची संख्या ही १११ वर पोहोचली आहे. रविवारी एकूण २२ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले.
रविवारी एकूण १०४ संदिग्धांचे अहवाल आरोग्य विभागास प्राप्त झाले पैकी ८२ अहवाल हे निगेटीव्ह आले असून २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये सर्वाधिक १२ बाधीत रुग्ण हे एकट्या शेगाव तालुक्याील आळसणा गावातील आहेत. अशाप्रकारे आळसणा ता. शेगाव येथे 12 रूग्ण आढळले आहे. दरम्यान, बुलडाणा तालुक्यातील जामठी येथील दोन महिला, चिखलीतील इंदिरानगरमधील एक महिला, नांदुरा येतील दोन पुरुष, लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथील एक व्यक्ती व सहा वर्षाची मुलगी, जळगाव जामोद येथील ५७ वर्षीय व्यक्ती तर खामगाव तालुक्यातील टेंभूरणा येथील २० वर्षाचा तरूण आणि जळगाव खान्देश जिल्ह्यातील बोदवड येथील २४ वर्षीय महिला ही मलकापूर येथे पॉझिटिव्ह आढळून आली. दुसरीकडे रविवारी चार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये धामणगाव बढे येथील एक महिला, मेहकर तालुक्यातील डोणगाव येतील २२ वर्षीय व्यक्ती आणि मलकापूरमधील ४५ वर्षीय व्यक्ती आणि अन्य एकाचा समावेश आहे. आतापर्यंत ३,०७५ रिपोर्ट निगेटीव्ह आले असून १७६ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १११ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे.