CoronaVirus in Buldhana : आणखी २८ पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या १, ९९९

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 11:16 AM2020-08-12T11:16:38+5:302020-08-12T11:16:47+5:30

जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या १, ९९९ झाली असून मंगळवारी २८ नवे कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत.

CoronaVirus in Buldhana: 28 more positive; Total number of patients is 1,999 | CoronaVirus in Buldhana : आणखी २८ पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या १, ९९९

CoronaVirus in Buldhana : आणखी २८ पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या १, ९९९

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या १, ९९९ झाली असून मंगळवारी २८ नवे कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड टेस्टमध्ये तपासणी करण्यात आलेल्या अहवालांपैकी २२६ अहवाल मंगळवारी प्राप्त झाले होते. त्यापैकी १९८ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले.
प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये १५ अहवाल प्रयोगाशाळेतील तपासणी दरम्यान समोर आले तर १३ जणांचे अहवाल रॅपीड टेस्टमध्ये समोर आले. मंगळवारी पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये देऊळगाव राजा येथील चार, देऊळगाव मही येथील एक, दुसरबीड येथील दोन, लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथील दोन, ठालेगाव येथील एक, बुलडाणा येथील तीन, धामणगाव बढे येथील एक, शेगाव येथील एक, दाताला येथील एक, मलकापूरमधील पाच, खामगावमधील आठ जणांचा यात समावेश आहे.
दुसरीकडे २१ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यात मलकापूर मधील दोन, डोणगाव मधील एक , दाताळा एक, शेगाव दोन, बुलडाणा तीन, लोणार एक, जालना जिल्ह्यातील पारध येथील एक, चिखली तालुक्यातील दिवठाणा येथील एक, खामगावमधील सात, देऊळगाव राजा एक आणि मेहकरमधील एक या प्रमाणे बरे झालेल्या रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातील १२ हजार ७७७ संदिग्ध रुग्णांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले असून एक हजार १९० रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
सध्या १३५ संदिग्ध रुग्णांचे अहवाल येणे बाकी आहे. तर जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधीतांची संख्या १, ९९९ झाली आहे असून प्रत्यक्षात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ७७४ आहे. आतापर्यंत ३५ कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी दिली. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात सातत्याने वाढत असल्याचे चित्र आहे.

Web Title: CoronaVirus in Buldhana: 28 more positive; Total number of patients is 1,999

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.