CoronaVirus in Buldhana : आणखी ३४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह: १८ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 07:00 PM2020-08-21T19:00:23+5:302020-08-21T19:00:54+5:30
१०२ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले तर ३४ जण कोरोना बाधीत आढळून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात शुक्रवारी ३४ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे वर्तमान स्थिती जिल्ह्यात ८४१ अॅक्टीव रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, एकूण कोरोना बाधीतांची संख्या २,४७१ झाली आहे. शुक्रवारी प्रयोगशाळेत आणि रॅपीड टेस्टमध्ये तपासण्यात आलेल्या १३६ संदिग्ध रुग्णांपैकी १०२ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले तर ३४ जण कोरोना बाधीत आढळून आले.
बाधीत रुग्णांपैकी खामगावमध्ये चार, साखरखेर्डा येथे दोन, मलकापूरमध्ये एक, धाड येथे एक, मासरूळ येथे एक, चिखलीमध्ये दोन, हातणी येथे एक, मासरूळ येथे एक, बुलडाण्यात एक, देऊळगाव राजात पाच, लोणारमध्ये आठ, मोताला येथे एक, शेगाव आटोळ येथे एक, शेवगा येथे एक, मेहकरमध्ये दोन, नांदुरा येथे तीन या प्रमाणे कोरोना बाधीत आढळून आल९ आहेत. दरम्यान, १८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. यामध्ये सुलतानपूर येथील दोन, ठालेगाव येथील एक, धामणगाव बढे येथील एक, शेगाव येथील पाच, पिंपळगाव काळे येथील एक, झोडगा वसर येथील एक, खामगाव शहरातील सात जण कोरोना मुक्त झाले आहेत. ग्रामीण भागातही कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. मात्र रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे दिसते.