CoronaVirus in Buldhana : आणखी ५४ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या २,६८९
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 12:13 PM2020-08-26T12:13:05+5:302020-08-26T12:13:15+5:30
मंगळवारी पुन्हा ५४ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले असून एकूण रुग्णांची संख्या आता २,६८९ झाली आहे.
बुलडाणा : जिल्ह्यात मंगळवारी पुन्हा ५४ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले असून एकूण रुग्णांची संख्या आता २,६८९ झाली आहे. दरम्यान, यापैकी ७५२ रुग्ण हे अॅक्टीव असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
मंगळवारी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेले आणि रॅपीड टेस्टमध्ये तपासणी करण्यात आलेल्या एकूण ३७५ रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३२१ अहवाल निगेटीव् आले तर ५४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये देऊळगाव मही येथील एक, देऊळगाव राजा सात, मोताळा येथील एक, धामणगाव बढे येथील एक, मेहकरमधील रामनगर भागातील चार, मलकापूरमधील सहा, भालगाव येथील चार, काटोडा येथील चार, मेरा बुद्रूक येथील एक, बुलडाणा १२, धामणगाव चार, मासरूळ एक, खामगाव आठ या प्रमाणे एकूण ५४ बाधीत रुग्ण आढळून आले.
दुसरीकडे मंगळवारी ११२ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यात देऊळगाव राजातील १४, असोला जहागीर दोन, असोला १४, खामगाव १७, मलकापूर पाच, दाताळा दोन, टाकली एक, सागवन एक, हतेडी चार, बुलडाणा तीन, दिवठाणा एक, अमडापूर तीन, अंचरवाडी पाच, चिखली चार, सवणा दोन, शेगाव नऊ, वारुडी एक, साखरखेर्डा चार, जळगाव जामोद एक, बिबी एक, अंजनी एक, गवंढळा एक, नागापूर एक, जानेफळ चार, मेहकर चार, नांदुरा येथीलसात जणांचा यात समावेश आहे. दरम्यान, आतापर्यंत १५,६३३ संदिग्ध रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह आले आहे.