CoronaVirus in Buldhana : आणखी ६९ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या  ६२५

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 12:23 PM2020-07-16T12:23:46+5:302020-07-16T12:23:51+5:30

जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही ६९ व्यक्तीं कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

CoronaVirus in Buldhana: 69 more positive; 625 patients | CoronaVirus in Buldhana : आणखी ६९ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या  ६२५

CoronaVirus in Buldhana : आणखी ६९ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या  ६२५

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही ६९ व्यक्तीं कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे रुग्ण संख्या ६२५ झाली आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ३८० अहवाल बुधवारी प्राप्त झाले. त्यापैकी ३११ अहवाल निगेटीव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह अहवालामध्ये एक प्रयोग शाळेतून आलेला अहवाल तर ६८ जण हे रॅपीड टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आले आहेत.
यामध्ये सर्वाधिक कोरोना बाधीत हे खामगाव शहरात आढळून आले असून त्यांची संख्या २९ आहे. देऊळगाव राजा शहरात १७ जण, जळगाव जामोदमध्ये दोन, शेगावमध्ये सहा, नांदुरा येथे पाच, बुलडाणा शहरात एक, मेहकर तालुक्यातील नागापूर येथे एक, चिखली शहरात सहा आणि मलकापूरमध्ये एक या प्रमाणे ६९ रुग्ण जिल्ह्यात आढळून आले आहेत.
दुसरीकडे १३ बाधीतांनी कोरोनावर मात केल्याने १५ जुलै रोजी त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामध्ये मलकापुरमधील मंगल गेट मधील पाच, आळंद येथीलएक, खामगाव बसस्थानकानजीकच्या एक महिलेसह पाच जण, शेगाव तालुक्यातील आळसणा येथील दोन आणि मलकापूर शहरातील आणखी एका महिलेचा समावेश आहे.
आतापर्यंत पाच हजार ३३९ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. त्याच प्रमाणे आतापर्यंत २८५ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. सध्या ३५ संदिग्ध रुग्णांच्या अहवालांची प्रतीक्षा असून अ‍ॅक्टीवर असलेल्या ३१९ बाधीतांवर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. जिल्हयात आतापर्यंत १८ कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी दिली. जिल्हयात सध्या झपाट्याने बाधीत रुग्ण वाढत आहे.


करवंड येथील रुग्णाचा मृत्यू
चिखली तालुक्यातील करवंड येथील ४० वर्षीय व्यक्तीचा बुलडाणा येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्या पार्थिवावर बुलडाणा येथील जुन्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रारंभी स्थानिकांनी त्यास विरोध केला होता. मात्र नंतर स्थानिकांचा विरोध मावळला होता.

Web Title: CoronaVirus in Buldhana: 69 more positive; 625 patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.