CoronaVirus in Buldhana : आणखी ९३ पॉझिटिव्ह: रुग्णसंख्या ५,५९७
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 11:39 AM2020-09-19T11:39:48+5:302020-09-19T11:39:55+5:30
९३ जण कोरोना बाधीत आढळून आले असून जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या त्यामुळे ५,५९७ झाली आहे.
बुलडाणा: शुक्रवारी जिल्ह्यात ९३ जण कोरोना बाधीत आढळून आले असून जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या त्यामुळे ५,५९७ झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत ६९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट केलेल्यांपैकी एकूण ४१४ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ३२१ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले तर ९३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ७३ व रॅपीड टेस्टमधील २० अहवालांचा समावेश आहे.
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये खामगाव १२, घाटपुरी दोन, पिंपळगाव राजा एक, शेगाव २१, पहूरजिरा एक, आडशूळ पाच, उन्हारखेड दोन, देऊळगाव मही एक, देऊळगाव राजा एक, मांडवा एक, गायखेड एक, सावरगाव मुंढे एक, किन्ही दोन, वडगाव तेजन एक, लोणार एक, मलकापूर तीन, नरवेल एक, वडजी एक, मेहकर एक, जामोद एक, जळगाव जामोद एक, सिंदखेड राजा एक, सहस्त्रमुळी एक, टाकळी एक, मोताळा सहा, चिखली दहा, मेरा खुर्द दोन, असोला एक, सातगाव भुसारी दोन, वरवंड एक, बुलडाणा तीन, निमगाव एक, खुमगाव बुर्टी एक, जळघाव खान्देश जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील एका पॉझिटिव्ह रुग्णाचा यात समावेश आहे.
दरम्यान, शुक्रवारी ७६ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांची रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. साखरखेर्डा तीन, शेंदुर्जन दोन, राजेगाव एक, सिंदखेड राजा एक, देूळगाव राजा आठ, देऊळगाव मही पाच, गारखेडा पाच, पांगरी एक, वरूड एक, चिखली ेक, तांबोळा तीन, सुलतानपूर एक, चिखला एक, खामगाव एक, कळंबेश्वर एक, बेलगाव सात, लाखनवाडा एक, मलकापूर १५, विवरा एक, पि. देवी एक, धा. बढे एक, नांदुरा दोन, निमगाव सहा, बेलुरा एक, वडनेर एक, खेर्डा एक, जळगाव जामोद तीन आणि जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथील एकाचाही यात समावेश आहे.