CoronaVirus in Buldhana : आणखी एक मृत्यू; १२९ नवे पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 12:06 PM2020-09-23T12:06:08+5:302020-09-23T12:06:22+5:30
मंगळवारी १२९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
बुलडाणा : कोरोना संक्रमणाची व्याप्ती जिल्ह्यात झपाट्याने वाढत असून २२ सप्टेंबर रोजी एकूण कोरोना बाधीतांच्या संख्येने सहा हजारांचा टप्पा ओलांडला असून सध्या जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधीतांची संख्या ६,०८० झाली आहे. दरम्यान, मंगळवारी १२९ जणांचे अहवाल पॉझिटिव्हआले असून एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
दुसरीकडे मंगळवारी प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या व रॅपीड टेस्टमध्ये तपासम्यात आलेल्यांपैकी ६८३ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये १२९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर ५५४ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालापैकी ११५ तर रॅपीड टेस्टमधील १४ जणांच्या अहवालाचा समावेश आहे.
पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये खामगाव येथील १६, टेंभुर्णा एक, आंबेटाकळी तीन, बेलोरा एक, येराळी एक, जळगांव जामोद चार, कोथळी एक, वडगाव एक , चिखली आठ, मेरा खु. एक, ब्रम्हपुरी सात, महिमाळ एक, शिंदी हराळी एक, अंबाशी दोन, पेठ एक, बुलडाणा १७, धरणगाव एक, दाताळा दोन, मलकापूर १२, शेगाव दोन, साखरखेर्डा तीन, सावखेड नजीक दोन, तडेगाव एक, गाडेगाव एक, देऊळगाव राजा सहा, हिवरा आश्रम एक, गिरोली एक, देऊळगाव धनगर एक, निमखेड एक, धोत्रा एक, देऊळगाव मही दोन, धाड दोन, देऊळघाट एक, तांदुळवाडी एक, मेहकर सात, नांदुरा १३ आणि वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील एक,अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील एका संशयिताचा बाधीत रुग्णांमध्ये समावेश आहे. दरम्यान, मलकापूर येथील ५८ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्युचे होण्याचे प्रमाण सध्या १.२५ टक्के आहे.