CoronaVirus In Buldhana : ५४ स्वॅब नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 11:59 AM2020-05-16T11:59:23+5:302020-05-16T11:59:31+5:30
५४ जणांच्या स्वॅब नमुन्याच्या अहवालाची अद्याप प्रतीक्षा असून १६ मे रोजी हे अहवाल प्राप्त होण्याची शक्यता आहे.
बुलडाणा : आॅरेंज झोनमधील जिल्ह्यांमध्ये देण्यात आलेल्या काही शिथीलतेमुळे बुलडाणा जिल्ह्यात स्वगृही परतणाऱ्यांची संख्या वाढली असून त्यामुळे संदिग्ध रुग्णांचे स्वॅब नमुने घेण्याचेही प्रमाण वाढत आहे. अशाच ५४ जणांच्या स्वॅब नमुन्याच्या अहवालाची अद्याप प्रतीक्षा असून १६ मे रोजी हे अहवाल प्राप्त होण्याची शक्यता आहे.
अकोला येथील प्रयोग शाळेतून जिल्ह्यातील संदिग्ध रुग्णांपैकी दहा जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. यामध्ये जळगाव जामोद, नांदुरा येथील संदिग्धांसह दिल्ली तथा अन्य राज्यातून जिल्ह्यात आलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. कोवीड रुग्णालयात सध्या दोन कोरोना बाधीत रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या जवळपास ५४ जणांचे स्वॅब नमुन्याचे अहवाल अद्याप अकोला येथील प्रयोग शाळेतून अद्याप प्राप्त झालेले नाही. प्रसंगी उद्या ते प्राप्त होण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने मलकापूर पांग्रा येथील कोरोना पॉझीटीव्ह आलेल्या अल्पवयीन मुलीच्या संपर्कात आलेल्या २२ जणांसह अन्य काही संदिग्धतांचा समावेश असल्याची माहिती आरोग्य विभागातील सुत्रांनी दिली. आतापर्यंत बुलडाणा जिल्ह्यातील ८२३ व्यक्तींचे कोरोना चाचणीसाठी स्वॅब नमुने घेण्यात आले असून १५ मे रोजी जवळपास ४४ व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले.
(प्रतिनिधी)