CoronaVirus in Buldhana : आणखी एकाचा मृत्यू; १७७ नवे पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 11:41 AM2020-09-14T11:41:02+5:302020-09-14T11:41:21+5:30

परिणामी जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे ६४ जणांचा मृत्यू झाला आहे.

CoronaVirus in Buldhana: Death of another; 177 New positives | CoronaVirus in Buldhana : आणखी एकाचा मृत्यू; १७७ नवे पॉझिटिव्ह

CoronaVirus in Buldhana : आणखी एकाचा मृत्यू; १७७ नवे पॉझिटिव्ह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: कोरोना बाधीतांची संख्या जिल्ह्यात वाढत असून असून सलग दुसऱ्या दिवशी १७७ कोरोना बाधीत जिल्ह्यात आढळून आले असून बुलडाणा शहरालगतच्या सुंदरखेड परिसरातील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. परिणामी जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे ६४ जणांचा मृत्यू झाला आहे.
प्रयोगशाळेत पाठविलेल्या व रॅपीड टेस्टमध्ये तपासण्यात आलेल्यांपैकी ८०७ जणांचे अहवाल १३ सप्टेंबर रोजी प्राप्त झाले. पैकी ६३० जणंचे अहवाल निगेटीव्ह आले तर १७७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये खामगाव शहरात ३७, देऊळगाव राजात दोन, गारखेड येथे दोन, पिंपळगाव येथे एक, देऊळगाव मही येथे पाच, अंढेरा येथे एक, बुलडाणा ३३, कोलवड एक, वाकडी दोन, चांडोळ एक, डोमरूळ एक, खुपगाव एक, मासरूळ एक, दुधा एक, मोहखेड एक, चिखली तीन, दुधलगाव दोन, शेलुद एक, मलकापूर पाच, कुंड बु. एक, मेहकर दोन, डोणगाव एक, पिंप्री माळी एक, शेलगाव देशमुख एक, उकळ एक, सावत्रा दोन, हिवरा गार्डी चार, घाटबोरी एक, देऊळगाव साकर्शा चार, जांभूळ एक, चिंचोली एक, नांदुर एक, भुईशिंगा एक, जळगांव जामोद नऊ, खेर्डा चार, वाडी खुर्द दोन, वडशिंगी दहा, पळशी घाट एक, मडाखेड एक, धामणगाव बढे एक, टाकळी एक, टाकरखेड एक, माकोडी एक, लोणार तीन, लाखनवाडा एक, टेंभुर्णा एक, सिंदखेड राजा एक, मोताला दोन, बोडखा दोन, शेगाव ११, अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील टाकनघाट येथील एक संशयीत असे १७७ जण पॉझिटिव्ह निघाले. सुंदरखेड येथील एकाचा मृत्यू झाला.

१०७ रुग्णांची कोरोनावर मात
१०७ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामध्ये मेडगाव चार, देऊळगाव मही सहा, अंढेरा एक, उमरखेड एक, शेगाव दोन, नांदुरा पाच, खामगाव दहा, चिखली आठ, धोत्रा एक, मेरा बुद्रूक एक, एकलारा एक, सवडत सहा, झोटिंगा एक, बारलिंगा नऊ, वाघाळा एक, पिंपळगाव पुडे एक, बुलडाणा सात, निमगाव दोन, मेहकर तीन, माटरगाव तीन, डोणगाव एक, जळगाव जामोद एक, मडाखेड दोन, खेरडा एक, देऊळगाव राजा चार, मलकापूर एक, सिंदखेड राजा सहा, सुलतानपूर एक, संग्रामपूर एक, लोणार एक, धामणगाव बढे पाच यासह अन्य ठिकाणच्या व्यक्तींचा समावेश होता.
 

Web Title: CoronaVirus in Buldhana: Death of another; 177 New positives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.