Coronavirus in Buldhana : आणखी एकाचा मृत्यू; १८४ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 12:03 PM2020-09-27T12:03:09+5:302020-09-27T12:03:20+5:30

मलकापूर तालुक्यातील धरणगाव येथील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Coronavirus in Buldhana: death of another; 184 positive | Coronavirus in Buldhana : आणखी एकाचा मृत्यू; १८४ पॉझिटिव्ह

Coronavirus in Buldhana : आणखी एकाचा मृत्यू; १८४ पॉझिटिव्ह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: शनिवारी तपासणीदरम्यान जिल्ह्यात आणखी १८४ जण कोरोना बाधीत आढलून आले आहेत. दरम्यान, मलकापूर तालुक्यातील धरणगाव येथील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधीतांची संख्या ही ६६०३ झाली आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ५६० अहवाल अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ३७६ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले तर १८४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये चिखली पाच, मेरा बुद्रूक दोन, सवणा एक, अंबाशी चार, सातगाव भुसारी एक, शिरपूर एक, करतवाडी एक, खामगाव २२, हिवरखेड एक, शिर्ला नेमाने एक, घाटपुर एक, नांदुरा १३, जळगाव जामोद नऊ, वाडी खुर्द एक, वडशिंगी पाच, शेगाव तीन, पहुर जिरा एक, कन्हारखेडा तीन, भोनगाव एक, वडगाव एक, मोताळा दोन, मलकापूर पाच, झोडगाव एक, दुसरबीड एक, तडेगाव तीन, साखरखेर्डा एक, तांबोळा पाच, लोणार दोन, पिंपळगाव माळी, सोनाटी दोन, कदमापूर एक, आरेगाव दोन, कनका दोन, देऊळगाव माळी एक, मेहकर १३, बुलडाणा ३२, दहिद बुद्रूक दोन, घानेगाव एक , सातगाव एक, देऊळगाव राजा १२, आसोला एक, देऊळगाव मही ११, गिरोली खुर्द एक आणि जळगाव खान्देशमधील बोडखा गावातील एक, औरंगाबाद येथील एक या प्रमाणे १८४ रुग्ण बाधीत आढळून आले आहेत. दरम्यान, मलकापूर तालुक्यातील धरणगाव येथील एका ५० वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दरम्यान, १२७ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. यामध्ये खामगाव कोवीड सेंटरमधून २७, शेगावमधून २४, मलकापूरमधून तीन, बुलडाण्यातील आयुर्वेद महाविद्यालय कोवीड सेंटरमधून १८, अपंग विद्यालयातील एक, चिखली १५, लोणार १९, मोताळा तीन, मेहकर दोन, नांदुरा १३, जळगाव जामोद पाच या प्रमाणे कोरोनामुक्त झालेल्यांना सुटी देण्यात आली आहे.

Web Title: Coronavirus in Buldhana: death of another; 184 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.