CoronaVirus in Buldhana : आणखी एकाचा मृत्यू; ५६ नवे पॉझिटिव्ह रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 12:32 PM2020-10-11T12:32:22+5:302020-10-11T12:32:32+5:30
CoronaVirus बुलडाणा जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ८,०२५ झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात कोरोनाचे ५६ रुग्ण आढळून आले असून चिखली तालुक्यातील हरणी येथील ६५ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान, त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ८,०२५ झाली असून एकूण १०६ जणांचा मृत्यू झाला आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड टेस्ट झालेल्यापैकी एकूण ४८९ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ५६ जणांचे अहवाल् पॉझिटिव्ह आले तर ४३३ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले. पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये चांडोळ येथील ेक, बुलडाणा चार, देऊळगाव राजा एक, सावखेड नागरे दोन, देऊळगाव मही दोन, पळसकेड चक्का एक, मोताला एक, कारेगाव एक, चिंचपूर एक, खामगाव दहा, शिंदी एक, आठोडवडी एक, पिंपळनेर एक, सरस्वती ेक, गुंजखेड दोन, लोमार एक, नांदुरा चार, येरळी एक, चिखली १२, शेगाव आटोळ एक, मेहकर एक, उकळी एक, शेगाव एक, जलंब एक या प्रमाणे कोरोना बाधीत व्यक्तींचा समावेश आहे. दुसरीकडे चिखली तालुक्यातील हरणी येथील एकाचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला.
या व्यतिरिक्त शनिवारी ६९ जणांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. बुलडाणा कोवीड केअर सेंटरमधील १५, मोताळा दोन, चिखली चार, नांदुरा ११, सिंदखेड राजा दहा, लोणार दहा आणि देऊळगाव राजातील दहा जणांचा यात समावेश आहे.