CoronaVirus in Buldhana : आणखी एकाचा मृत्यू; ९३ पॉझिटिव्ह, १०४ जणांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 07:22 PM2020-09-06T19:22:19+5:302020-09-06T19:22:49+5:30
पळशी बुद्रूक येथील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात कोराना बाधीतांची संख्या झपाट्याने वाढत असून रविवारी ९३ जण पॉझिटिव्ह आले तर पळशी बुद्रूक येथील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान जिल्ह्यातील कोरोना बाधीतांचा आकडा ३,८४५ वर पोहोचला असून त्यापैकी १०५४ रुग्णांवर सध्या उपचार करण्यात येत आहेत.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपीड टेस्ट केलेल्या ३०८ रुग्णांचे अहवाल रविवारी प्राप्त झाले. त्यापैकी २१५ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले तर ९३ जण पॉझिटिव्ह निघाले आहेत.
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा येथे नऊ, कल्याणा तीन, शेंदला एक, मेहकर चार, खामगाव चार, घाटपुरी एक, लांजुड एक, टेंभुर्णा एक, चितोडा तीन, शेगाव दहा, निमगाव पाच, तांदुळवाडी दोन, उमरद ११, किनगाव राजा एक, साखरखेर्डा एक, सि. राजा दोन, देऊळगावराजा तीन, अंढेरा एक, गारगुंडी एक, लेणार ए, निपाना एक, खेर्डा एक, चिखली एक, सावरगाव एक, नांदुरा दोन, मलकापूर तीन, जवळा बुद्रूक सहा, विवरा तीन, सुलतानपूर चार, धानोरा एक, भुमराळा एक, चिखला एक आणि जालना जिल्ह्यातील पारध, धावडा आणि वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील प्रत्येकी एक या प्रमाणे कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, खामगाव तालुक्यातील पळशी बुद्रूक येथील एका ६६ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी तपासणीसाठी समोर येण्याचे आवाहनही आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील संदिग्ध रुग्णांपैकी २० हजार ४९ जणांचे अहवाल आतापर्यंत निगेटीव्ह आले आहेत तर बाधीत रुग्णांपैकी २,७३३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.जिल्ह्यातील १,४०९ संदिग्धांच्या अहवालाची प्रशासनाला प्रतीक्षा आहे.
आतापर्यंत ५८ जणांचा मृत्यू
सध्या जिल्ह्यात एकूण ३,८४५ कोरोनाबाधीत रुग्ण असून त्यापैकी १,०५४ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत तर जिल्ह्यात ५८ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला होता.
१०४ जणांची कोरोनावर मात
रविवारी १०४ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यात बुलडाणा १२, मलकापूर एक, नांदुरा सहा, खामगाव १३, चिखली आठ, भालगाव तीन, काठोडा चार, मेराबुद्रूक एक, किन्ही सवडत एक, चांधई दोन, कारखेड दोन, दहिगाव एक, सोमठाणा दोन, देऊळगाव राजा आठ, बिबी एक, शेगाव नऊ, जळगाव जा. दोन, मलकापूर एक, दुधलगाव तीन, लोणार एक, निमगाव १५, सिंदखेड राजा पाच रुग्णांचा समावेश आहे.