CoronaVirus in Buldhana : दोघांचा मृत्यू; ४३ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 12:33 PM2020-10-09T12:33:17+5:302020-10-09T12:33:27+5:30
CoronaVirus in Buldhana सुलतानपूर आणि बुलडाणा येथील दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात गुरूवारी ४३ कोरोना बाधीत व्यक्ती आढळून आल्या असून सुलतानपूर आणि बुलडाणा येथील दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान वर्तमान स्थितीत एकूण कोरोना बाधीतांची संख्या ही ७,९१४ झाली असून त्यापैकी ७५१ अॅक्टीव्ह रुग्ण आहेत.
गुरूवारी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड टेस्टमध्ये तपासण्यात आलेल्या ३९४ अहवालापैकी ३५१ अहवाल निगेटीव्ह आले असून ४३ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये तालखेड येथील एक, पिंप्री गवळी येथील एक, फुली येथील एक, सांगळद येथील एक, आडविहीर येथील एक, धामंदा येथील दोन, बुलडाणा शहरातील दोन, सावळी येथील एक, चांडोळ येथील एक, देऊळगाव राजा येथील एक, सावंगी टेकाळे येथील एक, चिखली तीन, रिधोरा दोन नांदुरा सात, दहीगाव एक, मेहकर सहा, लोणी गवळी एक, पि. माळी एक, मोळा एक, लोणी काळे एक, सातोळी एक, जलंब एक, खामगाव पाच या प्रमाणे ४३ व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या आहेत. दरम्यान, गुरूवारी लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथील ६५ वर्षीय व्यक्ती व बुलडाणा येथील ६३ वर्षी महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसरीकडे १६५ बाधीतांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांची रुग्णालयातून सुटी करण्यात आली. त्यामध्ये देऊळगाव राजा कोवीड केअर सेंटरमधून एक, मेहकरमदून १४, नांदुरा १४, जळगाव जामोद तीन, कामगाव २२, शेगाव २२, मोताळा १५, मलकापूर १५, संग्रामपूर पाच, लोणार १९ आणि बुलडाणा येथील आयुर्वेद महाविदलयाच्या कोवीड केअर सेंटरमधील २२ तर चिखलीमधील १२ जणांचा समावेश आहे.