CoronaVirus in Buldhana : एकाचा मृत्यू, ५३ जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 11:24 AM2021-06-12T11:24:05+5:302021-06-12T11:24:18+5:30
Coronavirus in Buldhana: शुक्रवारी एकाचा मृत्यू झाला तर ५३ जण तपासणीत कोरोना बाधित आढळून आले आहेत.
११२ जणांची कोरोनावर मात
बुलडाणा: कोरोनामुळे जिल्ह्यात शुक्रवारी एकाचा मृत्यू झाला तर ५३ जण तपासणीत कोरोना बाधित आढळून आले आहेत. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी एकूण ३ हजार ८१६ जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ३ हजार ७६३ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये बुलडाणा तालुक्यात १४, खामगाव ४, देऊळगाव राजा २, चिखली ३, मेहकर ९, मलकापूर ७, नांदुरा ४, लोणार ५, जळगाव जामोद २, सि. राजा ३ या प्रमाणे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान शेगाव, मोताळा आणि संग्रामपूर येथे एकही पॉझिटिव्ह रुग्ण तपासणीमध्ये आढळून आलेला नाही. उपचारादरम्यान मोताळा तालुक्यातील तळणी येथील ८२ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे ११२ जणांनी शुक्रवारी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत तपासणी करण्यात आलेल्यांपैकी ५ लाख २२ हजार १४६ संदिग्धांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. सोबतच ८४ हजार ८३१ बाधितांनी कोरोनावर मात केलेली आहे.
१,७२४ अहवालांची प्रतीक्षा
अद्यापही १ हजार ७२४ अहवालांची प्रतीक्षा असून जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता ८५ हजार ८७८ झाली आहे. त्यापैकी ४०६ सक्रीय रुग्णांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ४६१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली.