CoronaVirus in Buldhana : एकाचा मृत्यू; आणखी पाच जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 11:11 AM2020-06-15T11:11:37+5:302020-06-15T11:11:58+5:30

१४ जून रोजी एकूण पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आले असून मलकापूर येथील एका संदिग्ध रुग्णाचा अहवाल त्याच्या मृत्यूनंतर पॉझिटिव्ह आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

CoronaVirus in Buldhana: death of one; Five more positive | CoronaVirus in Buldhana : एकाचा मृत्यू; आणखी पाच जण पॉझिटिव्ह

CoronaVirus in Buldhana : एकाचा मृत्यू; आणखी पाच जण पॉझिटिव्ह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या सातत्याने वाढत असून १४ जून रोजी एकूण पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आले असून मलकापूर येथील एका संदिग्ध रुग्णाचा अहवाल त्याच्या मृत्यूनंतर पॉझिटिव्ह आल्यामुळे खळबळ उडाली आहे. मलकापूर शहरात गेल्या चार दिवसातील हा दुसऱ्या मृत्यू आहे. दोन्ही मृत रुग्णांचे अहवाल हे त्यांच्या मृत्यूनंतर पॉझिटिव्ह आले आहे, हे विशेष .
दरम्यान, संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथे आणखी तीन जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये ३३ आणि २२ वर्षीय व्यक्ती तथा २२ वर्षाची एक महिला पॉझिटिव्ह आली आहे. तर खामगाव तालुक्यातील चिखली येथील एकाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या ही ११८ वर पोहोचली आहे. आतापर्यंत ७७ रुग्ण बरे झाले आहेत तर सध्या ३६ रुग्णांवर बुलडाणा, खामगाव आणि शेगाव येथील आयसोलेशन कक्षात उपचार करण्यात येत आहे. कोरोना बाधीतांची संख्या सध्या जिल्ह्यात सातत्याने वाढत असून हा चिंतेचा विषय बनला आहे.


संदिग्धांचेही मृत्यू
कोरोना बाधीत नसलेल्या मात्र दुर्धर आजाराने उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या व्यक्तींचीही संख्या जिल्हयात चार आहे. कोलोरी, पिपळगाव काळे, नांदुरा आणि लोणार तालुक्यातील एक जणाचा यात समावेश आहे. मात्र हे रुग्ण कोरोना बाधीत नव्हते. परंतू अनुषंगीक प्रोटोकॉल पाळून त्यांचे अंत्यविधी करण्यात आले. डोमरूळ येथील बाधीत महिलेचा औरंगाबाद येथे मृत्यू झाला आहे.
पश्चिम वºहाडातील पहिला कोरोना बाधिताचा मृत्यू झालेल्या बुलडाणा जिल्ह्यात आता बाधीत रुग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत असून ७६ दिवसात पाच जणांचे मृत्यू झाले आहेत. सरासरी १५ दिवसानंतर एका कोरोना बाधिताचा मृत्यू असे प्रमाण सध्या जिल्ह्यात आहे. रुग्ण वाढीबरोवर ते वाढणार आहेच.

 

Web Title: CoronaVirus in Buldhana: death of one; Five more positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.