CoronaVirus in Buldhana : दोघांचा मृत्यू; १५१ बाधीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 11:37 AM2020-09-26T11:37:04+5:302020-09-26T11:37:53+5:30
नांदुरा येथील ५० वषीय व्यक्ती व साखरखेर्डा येथील ५२ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: शुक्रवारी कोरोना बाधीतांपैकी दोन जणांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला असून १५१ जण तपासणीमध्ये बाधीत आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या ही साडेसहा हजारांच्या टप्प्यात आली आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट मध्ये तपासणी करण्यात आलेल्यांपैकी ८४६ जणांचे अहवाल शुक्रवारी प्राप्त झाले. त्यापैकी ६९५ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर १५१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालापैकी १४२ जणांचे तर रॅपीड टेस्टमध्ये नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात प्रामुख्याने शेगाव येथील २९, पहुर जिरा दोन, पळशी खुर्द एक, जवळपा ेक, सिंदखेड राजा एक, चिखली तीन, अंबासी एक, देऊळगाव राजा एक, जळगाव जामोद पाच, पाडेगाव दोन, बुलडाणा शहर नऊ, मासरूळ एक, बाडगणी एक, दाताला एक, मलकापूर सात, धामणगाव बडे एक, भुमराळा तीन, सावरगाव एक, सुलतानपूर दोन, मांडवा सहा, दहिफळ दोन, हनवत खेड एक, लोणार ११, साखरखेर्डा पाच, गुंज एक, खेडी पाच, पान्हेरा एक, पिंपळपाटी एक, खामगाव दहा, विहीगाव एक, शिरसगाव निळे तीन, मांडका एक, अटाळी दोन, पिंपळगाव राजा एक, गरडगाव एक, नांदुरा १७, वडनेर दोन, मालेगाव गोंड एक, देऊळगाव साकर्शा चार, जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील धोपटेश्वर येथील दोन तर उस्मानाबाद जिल्ह्यातील करमाळा येथील एका बाधीत रुग्णाचा यात समावेश आहे.
दुसरीकडे नांदुरा येथील ५० वषीय व्यक्ती व साखरखेर्डा येथील ५२ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. २४ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता तर २५ सप्टेंबरला दोन जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी १२१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये खामगाव कोवीड केअर सेंटरमधून १६, शेगाव १२, मलकापूर ११, बुलडाणा येथील आयुर्वेद महाविद्यालयातील २३, चिखली येथील पाच, देऊळगाव राजा येथील १८, लोणार तीन, सिंदखेड राजा सहा, मोताळा दोन व मेहकर येथील कोवीड केअर सेंटरमधून २५ जणांची कोरोनामुक्त झाल्यामुळे रुग्णालयातून सुटी करण्यात आली आहे.