CoronaVirus in Buldhana : आणखी दोघांचा मृत्यू; १४३ पॉझिटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 10:22 AM2020-09-30T10:22:27+5:302020-09-30T10:22:41+5:30
मंगळवारी जिल्ह्यात दोन बाधीतांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत ८८ जणांचा कोरोनामुले जिल्ह्यात मृत्यू झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: मंगळवारी जिल्ह्यात १४३ बाधीत रुग्ण आढळून आले असून एकून कोरोना संक्रमीत झालेल्या रुग्णांची संख्या ६,९९७ झाली आहे. दरम्यान, मंगळवारी जिल्ह्यात दोन बाधीतांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत ८८ जणांचा कोरोनामुले जिल्ह्यात मृत्यू झाला आहे.तसेच १५३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
साखरखेर्डा येथील ४५ वर्षीय व्यक्ती आणि औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात येत असलेल्या फर्दापूर येथील ७५ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. कोरोना बाधीत आढळून आलेल्यांमध्ये खामगाव १९, बोरजवळा नऊ, गवंढळा एक, घाटपुरी ेक, जनुना एक, शिरसगाव ेक, शेगाव १८, जवळ दोन, सवर्णा दोन, जहांगीरपूर दोन, घुस्सर पाच, पिंपळपाटी एक, आव्हा एक, मोताला चार, नांदुरा १२, माटोडा एक, मलकापूर सात, देवधाबा एक, चिखली १२, पेठ एक, करतवाडी एक, टुनकी एक, वरवट बकाल दोन, पांग्रा डोळे १७, वढव एक, लोणार चार, साखरखेर्डा सहा, ताडशिवणी एक, तडेगाव एक, देऊळगाव राजा एक, बुलडाणा तीन, सुनगाव एक आणि औरंगाबाद जिल्ह्यातील फर्दापूर येथील एकाचा समावेश आहे.दुसरीकडे १५३ जणांनी मंगळवारी कोरोनावर मात केली. त्यामध्ये शेगाव कोवीड सेंटरमधील १९, खामगाव ४४, मलकापूर एक, नांदुरा १५, देऊळगाव राजा २७, बुलडाणा ३५, चिखली आठ, लोणार तीन आणि मेहकरमधील एकाचा समावेश आहे. २९ हजार ७८६ संदिग्धांचे अहवाल निगेटीव्ह आले असून ५,८२० कोरोना बाधीत व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ९८४ संदिग्धांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात ६,६९७ कोरोना बाधीतांची संख्या असून त्यापैकी १०८९ अॅक्टीव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत