CoronaVirus in Buldhana : ‘क्लस्टर कंटेन्मेंट प्लॅन’ची प्रभावी अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 11:27 AM2020-04-17T11:27:16+5:302020-04-17T11:27:24+5:30

- नीलेश जोशी  लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : कोरोनाचा समूह संसर्ग रोखण्याच्या दृष्टीकोणातूनच बुलडाणा जिल्ह्यातील सात झोनमध्ये सध्या क्लस्टर ...

CoronaVirus in Buldhana: Effective implementation of 'Cluster Containment Plan' | CoronaVirus in Buldhana : ‘क्लस्टर कंटेन्मेंट प्लॅन’ची प्रभावी अंमलबजावणी

CoronaVirus in Buldhana : ‘क्लस्टर कंटेन्मेंट प्लॅन’ची प्रभावी अंमलबजावणी

Next

- नीलेश जोशी 
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोनाचा समूह संसर्ग रोखण्याच्या दृष्टीकोणातूनच बुलडाणा जिल्ह्यातील सात झोनमध्ये सध्या क्लस्टर कंटेन्मेंट प्लॅनची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे तथा घालून दिलेल्या नियमांचे नागरिकांनी पालन केल्यास कोरोना ससंर्गाची साखळी रोखण्यात जिल्ह्याला मोठे यश मिळू शकते. त्यादृष्टीनेच जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी ‘लॉक डाऊन-२’ मध्ये संचारबंदीची अधिक सक्तीने अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, एकीकडे संचारबंदीची कडक अंमलबजावणी होत असतानाच आपत्ती व्यवस्थापनातंर्गत ग्रामीण भागातही वैद्यकीय सुविधांसह संदिग्ध रुग्णांना इन्स्टीट्यूशनल क्वारंटीनमध्ये ठेवण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. त्यानुषंगानेच जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. रामेश्वर पुरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत व अन्य काही निवडक अधिकाऱ्यांनी सिंदखेड राजा, मेहकर आणि चिखली तालुक्यातील ग्रामीण भागाचा दौरा केला. मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथीलही काही ठिकाणांची त्यांनी पाहणी केली. जिल्ह्यात तुर्तास समुह संक्रमणाचा धोका नसला तरी २१ कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात गंभीरता वाढली असल्याचे जिल्हा प्रशासनाने अधोरेखीत केले आहे. त्यामुळे लॉकडाऊन-टू मध्ये बंधणे अधिक कडक करण्यात आली आहे. परिणामस्वरुप १६ एप्रिल रोजी बुलडाणा जिल्ह्यातील बहुतांश भागात अकार फिरणाºयांना रोखण्यात येऊन कारवाई करण्यात आली.

काय आहे क्लस्टर कंटेन्मेंट प्लॅन?

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी क्लस्टर कंटेन्मेंट प्लॅन अ‍ॅक्टीव करण्यात आल्याचे गेल्या एक महिन्यापासून ऐकिवात येत आहे. त्यामुळे क्लस्टर कन्टेन्मेंट प्लॅन म्हणजे नेमके काय?, असा प्रश्ना जिल्हावासियांना पडलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातील दोन मोठ्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता क्लस्टर म्हणजे समुह आणि कटेन्मेंट म्हणजे प्रसार रोखणे अर्थात समुहात होणाºया संसर्गाचे संक्रमण रोखण्यासाठीची करण्यात येणारी उपाययोजना म्हणजे क्लस्टर प्लॅन होय.
यामध्ये प्रामुख्याने कोरोना पॉझीटीव्ह आलेल्या रुग्णाच्या घराच्या २०० मिटर परिघ सीलबंद करून तेथील नागरिकांना घरातच राहण्याबाबत सांगून त्या भागात असलेल्या संपूर्ण लोकसंख्येची नियमितपणे आरोग्य तपासणी करण्यात येते. त्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या पथकाद्वारे नियमित अशा भागातील नागरिकांची तपासणी व आरोग्य विषयक काही तक्रारी असल्यास त्याची माहिती घेतल्या जाते. दोन जणांच्या एका पथकाद्वारे ५० व्यक्तींचे आरोग्य विषयक मॉनिटरींग करण्यात येते. त्यांच्या मदतीसाठी डॉक्टरही असतात. प्रसंगी अशा परिघातील व्यक्तींना काही त्रास असल्याच त्यांच्यावर वेळीच उपचार करण्यात येऊन समुह संक्रमण रोखल्या जाते. दरम्यान, बाधीत रुग्णाच्या घरापासूनच्या दोन किंवा तीन किमीच्या परिघास बफर झोन घोषित करण्यात येते. या भागातही नागरिकांच्या ये-जा करण्यावर निर्बंध घालण्यात येतात. जिल्ह्यात ज्याठिकाणी कोरोना संसर्ग झालेले रुग्ण आढळून आले आहेत, अशा सात ठिकाणी याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

 

Web Title: CoronaVirus in Buldhana: Effective implementation of 'Cluster Containment Plan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.