CoronaVirus in Buldhana : आणखी चौघांचा मृत्यू; १४७ नवे पॉझिटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 07:17 PM2020-09-05T19:17:04+5:302020-09-05T19:17:17+5:30
जिल्ह्यात सलग दोन दिवसात आठ जणांचा मृत्यू झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून शनिवारी आणखी चौघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात सलग दोन दिवसात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच १७४ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. जिल्ह्यात मृत्यूची संख्या ५७वर पोहचली असून रुग्णसंख्या ३७५२ झाली आहे. २ हजार ६२९ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात एक हजार ६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच शनिवारी ५७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे.
शनिवारी मलकापूर येथील ४५ वर्षीय पुुरूष, मेहकर येथील ६५ वर्षीय पुरूष, लोणी गुरव ता. खामगाव येथील ८५वर्षीय पुरुष, माटरगाव ता. शेगाव येथील ८५ वर्षीय पुरूष व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये बुलडाणा शहर सहा, बुलडाणा तालुका पोखरी एक, मेहकर तालुका जानेफळ एक, डोणगांव एक, कळमेश्वर एक, मेहकर शहर ११, खामगांव शहर तीन , सुटाळपुरा सहा, बाळापुर फैल दोन, फरशी एक, अमृतनगर एक, तलाव रोड एक, टावर लेआउट एक, केला नगर एक, डीपी रोड एक, जगदंबा रोड एक, खामगांव तालुका : कदमापूर एक, लाखनवाडा एक, शेगांव शहर पाच, व्यंकटेश नगर तीन, जिजामाता नगर एक, माळीपुरा एक, नांदुरा तालुका जिगाव सात, सिं. राजा ता. मातला एक, साखरखेडा एक, चिंचोली चार, दरेगाव चार, सिं. राजा शहर दोन, दे. राजा शहर तीन, माळीपुरा एक, दे. राजा तालुका : मेंडगांव तीन, दे. मही दोन, उंबरखेड १, गारगुंडी १, कार्ला १, लोणार ९, मोताळा शहर ७, मोताळा तालुका धा. बढे दोन, शेलापूर १, संग्रामपूर : ७, जळगांव जामोद तालुका वाडी खुर्द ३, खेर्डा २, मडाखेड ३, चिखली ७, चिखली तालुका मेरा बु १, एक्लारा १, भरोसा १, जळगाव जामोद ८ , नांदुरा शहर ७ , मलकापूर येथील दोन रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात एक हजार ६६ रुग्णांवर उपचार सुरू
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ३७५२वर पोहचली असून २ हजार ६२९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या एक हजार ६६ कोरोना बाधीतावर उपचार सुरू आहेत. शनिवारी ६७१ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील १४७ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आजापर्यंत जिल्ह्यात १९ हजार ८३४ अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाले आहेत. तसेच जिल्ह्यातील ११४२ अहवालांची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ५७ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला,अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पुरी यांनी दिली.