CoronaVirus in Buldhana :  चार जणांना कोरोना संसर्गाची बाधा; रुग्णांची संख्या नऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 06:35 PM2020-04-05T18:35:08+5:302020-04-05T18:37:02+5:30

खामगाव तालुक्यातील चितोडा येथील एक, चिखलीमधील दोन आणि देऊळगाव राजा येथील एकाचा यात समावेश आहे.

CoronaVirus in Buldhana: Four people with Corona infection; The number of patients is nine | CoronaVirus in Buldhana :  चार जणांना कोरोना संसर्गाची बाधा; रुग्णांची संख्या नऊ

CoronaVirus in Buldhana :  चार जणांना कोरोना संसर्गाची बाधा; रुग्णांची संख्या नऊ

Next
ठळक मुद्देचिखली, देऊळगाव राजा तालुक्यासह चितोडा गावाची सीमा सील. जिल्ह्याची एकंदरीत परिस्थिती चिंताजनक बनत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शहर व तालुक्यांच्या सीमा सील करणे व तत्सम कार्यवाही तातडीने जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे.

बुलडाणा: जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा धोका वाढला असून पाच एप्रिल रोजी बुलडाणा जिल्ह्यातील चार जणांना कोरोना संसर्गाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. खामगाव तालुक्यातील चितोडा येथील एक, चिखलीमधील दोन आणि देऊळगाव राजा येथील एकाचा यात समावेश आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या आता नऊवर पोहोचली असून यातील एकाचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे.
या गंभीर बाबीच्या पार्श्वभूमीवर चिखली, देऊळगाव राजा आणि चितोडा येथे क्लस्टर प्लॅन अ‍ॅक्टीव करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी दिली. बुलडाणा जिल्ह्यातून अलिकडील काळात पाठविण्यात आलेल्या स्वॅब नमुन्यांपैकी चार जणांचे स्वॅब नमुने हे पॉझीटीव्ह आल्याचे दुपारी स्पष्ट झाले. त्यामुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. जिल्ह्याची एकंदरीत परिस्थिती चिंताजनक बनत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण आढळललेला भाग सील करण्यासोबतच तेथे आरोग्य पथकाद्वारे हायरिस्क झोनमधील नागरिकांची आगामी १४ दिवस तपसाणी, संबंधीत शहर व तालुक्यांच्या सीमा सील करणे व तत्सम कार्यवाही तातडीने जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे. महसूल, आरोग्य, पोलिस, जिल्हा परिषद आणि पालिका प्रशासनाच्या समन्वयातून हा प्लॅन कार्यान्वीत करण्यात येत आहे.

केद्र सरकारच्या व्हीसीमध्ये अधिकाऱ्यांची उपस्थिती
केंद्र सरकार राष्ट्रीय सुरक्षा विभाग ज्या मंत्रालयातंर्गत येतो त्या विभागाचे सचिव यांनी देशातील राज्यांच्या महत्त्वपूर्ण अधिकाऱ्यांकडून व्हीसीद्वारे सविस्तर माहिती घेतली. या व्हीसीस बुलडाणा जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, एस. पी. डॉ. दिलीप पाटील भुजबळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत प्रामुख्याने उपस्थित होते. केंद्र सरकारकडून दिलेल्या सुचना व मार्गदर्शक तत्वे तथा क्लस्टर प्लॅन प्रत्यक्ष राबविण्याबात या व्हीसीत गांभिर्याने सुचना दिल्या गेल्या.

भिलवाडा जिल्ह्याचा आदर्श ठेवा!
या व्हीसीमध्ये राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यात ज्या पद्धतीने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या. त्या पद्धतीने अन्यत्र काम व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली असून व्हीसीद्वारे भिलवाडा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाºयांनीही त्यांनी अवलंबलेल्या कार्यपद्धतीची माहिती दिली असल्याचे सुत्रांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले.

Web Title: CoronaVirus in Buldhana: Four people with Corona infection; The number of patients is nine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.