CoronaVirus in Buldhana : आपत्कालीन स्थितीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 12:19 PM2020-03-27T12:19:39+5:302020-03-27T12:21:45+5:30

जवळपास दहा व्हेंटीलेटर उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे.

CoronaVirus in Buldhana: Health system ready for emergencies | CoronaVirus in Buldhana : आपत्कालीन स्थितीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज

CoronaVirus in Buldhana : आपत्कालीन स्थितीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज

Next
ठळक मुद्देशहरातील चार रुग्णालयामध्ये २५ बेड उपलब्ध करण्यात आले आहेत.सामाजिक जबाबदारी म्हणून खासगी रुग्णालये ही सुविधा देण्यास तयार आहेत.

- नीलेश जोशी  
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोना संसर्गाचा उद्रेक बुलडाणा जिल्ह्यात झाला नसला तरी भविष्यातील संभाव्य धोका विचारात घेता आरोग्य यंत्रणेनेही त्या दिशने पावले टाकण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान, बुलडाणा शहरासह लगतच्या शहरातील डॉक्टरांनी आपत्कालीन स्थितीच्या दृष्टीने त्यांच्या रुग्णालयातील जवळपास दहा व्हेंटीलेटर उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे.
दुसरीकडे प्रसंगी जिल्ह्यात संसर्गाचा धोका हा सामाजिक संक्रमणापर्यंत पोहोचल्यास प्रभावी उपाययोजना करण्याच्या दृष्टीकोणातून आरोग्य यंत्रणेने पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे. त्यादृष्टीने आयएमए, फॉर्मासिस्ट, अन्न व औषध प्रशासन विभाग, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हाधिकारी यांची पालकमत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी बैठख घेऊन आढावा घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर बुलडाणा शहरातील चार रुग्णालयामध्ये २५ बेड उपलब्ध करण्यात आले आहेत.
सोबतच कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णासाठी गरज पडल्यास दहा व्हेंटीलेटरही राखीव ठेवण्यात येणार आहे. खासगी रुग्णालयाकडील हे व्हेंटीलेटर आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील खासगी प्रॅक्टीस करणाऱ्या डॉक्टरांनी प्रसंगी त्यांची सेवाही आरोग्य विभागास देण्याची तयारी दर्शवली आहे.
सामाजिक जबाबदारी म्हणून खासगी रुग्णालये ही सुविधा देण्यास तयार आहेत. दुसरीकडे कोरोना संदर्भात सेवा देण्यासाठी खासगी डॉक्टर तयार झाले असले तरी त्यांना पीपीई (सुरक्षा किट) उपलब्ध करण्याची गरज असल्याचेही आयएमएच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे खासगी रुग्णालयेही जिल्हा प्रशासनास सहकार्य करण्यास तयार असून त्यादृष्टीने उभय यंत्रणामध्ये समन्वय आहे. खासगी हॉस्पीटलचेही रुग्ण स्क्रीनींगसाठी मदत घेतल्या जात असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पंडित यांनी सांगितले.


स्त्री रुग्णालयाचीही दुरुस्ती व्हावी
जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलडाणा शहरात सुसज्ज असे १०० खाटांचे स्त्री रुग्णालय उपलब्ध आहे. येथे पाणीपुरवठ्यासह आॅक्सीजन पुरवठ्याची तजबीज त्वरित केल्यास हे रुग्णालय कोरोना संसर्गाच्या आपत्तीत जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारे आहे. राज्यात अशा पद्धतीची सुसज्ज व काहीशी बाजूला असलेली नवीन इमारत ही फक्त बुलडाण्यात उपलब्ध आहे. त्यादृष्टीने आरोग्य यंत्रणेने आता गांभिर्याने काम करण्याची गरज असल्याचेही आयएमएच्या पदाधिकाºयांनी सांगितले.


एकाच ठिकाणी रुग्ण ठेवावे
कोरोना संशयीत रुग्ण हे एकाच ठिकाणी ठेवण्यास प्राधान्य दिले जावे, अशी मागणीही आयएमएचे सचिव डॉ. जयसिंग मेहेर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली. दरम्यान, इटली, चीनमध्येही कोरोना संशयीत रुग्ण हे एकाच ठिकाणी ठेवण्यात आले होते. त्यामुळे इतरांना संसर्ग होण्याचा धोका टळतो, असे ते म्हणाले.

Web Title: CoronaVirus in Buldhana: Health system ready for emergencies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.