CoronaVirus in Buldhana : जिल्ह्यातील उद्योग व कारखानेही बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 04:30 PM2020-03-25T16:30:28+5:302020-03-25T16:30:53+5:30

३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा आदेश निर्गमीत करण्यात आला आहे.

 CoronaVirus in Buldhana: Industries and factories closed in the district | CoronaVirus in Buldhana : जिल्ह्यातील उद्योग व कारखानेही बंद

CoronaVirus in Buldhana : जिल्ह्यातील उद्योग व कारखानेही बंद

Next


बुलडाणा: खबरदारीचा उपाय म्हणून बुलडाणा जिल्ह्यातील उद्योग व कारखानेही बंद करण्यात येत आहे. त्यासंदर्भातील आदेशही जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी काढला आहे. अत्यावश्यक सेवेत मोडल्या जाणारी सेवा वगळता अन्य कारखाने ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा आदेश निर्गमीत करण्यात आला आहे.
साथरोग अधिनियम १८९७ मधील तरतुदीचा आधार घेत एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यांव्यतिरिक्त अन्य सर्व उद्योग व कारखाने २४ मार्च पासून ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशातून औषधे निर्माण करणाºया तसेच वैद्यकीय सेवेकरीता साहित्याची निर्मिती करणाºया कंपन्या, कारखाने व उद्योग, सॅनीटायझर, साबण, जंतूनाशक हॅन्डवाश तयार करणाºया कंपन्या, कारखाने, कृषी प्रक्रिया कंपन्या वगळण्यात आल्या आहेत.

Web Title:  CoronaVirus in Buldhana: Industries and factories closed in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.