CoronaVirus in Buldhana : पाच रुग्णांच्या अहवालाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 11:23 AM2020-04-21T11:23:58+5:302020-04-21T11:24:14+5:30

पाच रुग्णांचे नमुने अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत.

CoronaVirus in Buldhana: A report of five patients awaits | CoronaVirus in Buldhana : पाच रुग्णांच्या अहवालाची प्रतीक्षा

CoronaVirus in Buldhana : पाच रुग्णांच्या अहवालाची प्रतीक्षा

Next

बुलडाणा : जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या पाच रुग्णांचे अहवाल सोमवारी निगेटीव्ह आले आहेत. आता पाच रुग्णांचे नमुने अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत.
जिल्ह्यात एकूण २१ रूग्ण कोरोना पॉझीटीव्ह आढळलेले असून त्यापैकी एक मृत आहे. उर्वरित २० रूग्णांवर कोविड रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यापैकी १७ एप्रिल रोजी तीन रूग्णांचे नमुने निगेटिव्ह आले असून त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे रूग्णालयातून सुटी देण्यात आली, तर २० एप्रिल रोजी पाच कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा अहवाल निगेटीव्ह आल्यामुळे वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता आठ झाली आहे. सध्या रूग्णालयात १२ रूग्ण उपचार घेत आहेत. २० एप्रिल रोजी सहा अहवाल प्राप्त झाले आहेत. हे सर्व सहा अहवाल निगेटीव्ह आहेत. आता पाच रुग्णांचे स्वॅब नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत, आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल १९७ आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी. पुरी यांनी दिली आहे.

Web Title: CoronaVirus in Buldhana: A report of five patients awaits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.