Coronavirus in Buldhana : आणखी तीन पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या १५
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 10:23 IST2020-04-09T09:27:17+5:302020-04-09T10:23:31+5:30
पॉझीटीव्ह रुग्णांकडून झाले संक्रमण: पॉझीटीव्ह रुग्ण शेगाव, खामगावातील

Coronavirus in Buldhana : आणखी तीन पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या १५
बुलडाणा: जिल्ह्यातील कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून नऊ एप्रिल रोजी मध्यरात्री प्राप्त झालेल्या दहा जणांच्या अहवालापैकी तिघांचे स्वॅब नमुने पॉझीटीव्ह आल्याने जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. आता बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या १५ वर गेली आहे. यातील दोन व्यक्ती या शेगावामधील तर एक व्यक्ती खामगावमधील चितोडा गावाचा आहे. आठ एप्रिल रोजी बुलडाणा जिल्ह्यातून दिल्ली येथील कार्यक्रमात सह•ाागी झालेल्या व्यक्तींच्या संपर्कातील जवळपास ४४ व्यक्तींचे नमुने पाठविण्यात आले होते. त्यापैकी दहा जणांच्या स्वॅब नमुन्यांचे अहवाल हे मध्यरात्री प्राप्त झाले. त्यात सात जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर तिघांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. परिणामी बुलडाणा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या १५ वर गेली आहे. विशेष म्हणजे पॉझीटीव्ह आलेल्या रुग्णांना बाहेरगावी गेल्याची किंवा परदेशी गेल्याची कुठलीही हिस्ट्री नाही. त्यांना प्रारं•ाीच्या कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तींकडूनच हे संक्रमण मिळाले असल्याचे आरोग्य वि•ाागातील सुत्रांनी स्पष्ट केले. बुलडाणा जिल्ह्यातील ६२५ नागरिकांची आता पर्यंत कोरोना संसर्गाच्या संदर्•ााने तपासणी करण्यात आली आहे. पैकी ४११ व्यक्तींना सध्या क्वारंटीन करण्यात आलेले आहे. यात होम क्वारंटीन, हॉस्पीटल क्वारंटीन तथा इन्स्टीट्युशनल क्वारंटीनचा समावेश आहे. तर १६९ व्यक्तींच्या पाठविण्यात आलेल्या स्वॅब नमुन्यांपैकी १३५ व्यक्तींच्या स्वॅब नमुन्याचे अहवाल जिल्हा प्रशासनास प्राप्त झाले आहेत. यापैकी १५ जणांचे नमुने पॉझीटीव्ह आले असून यातील एकाचा २८ मार्च रोजी मृत्यू झाला होता. प्रामुख्याने बुलडाणा जिल्ह्यात बुलडाणा येथे पाच (एकाचा मृत्यू झालेला आहे.), चिखली येथे तीन, देऊळगाव राजा येथे एक, सिंदखेड राजा येथे एक, खामगाव तालुक्यातील दोन आणि शेगाव तालुक्यात तीन व्यक्ती कोरोना संसर्गाने बाधीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या संदर्•ाानेच जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. राजाराम पुरी व जिल्हाधिकारी कार्यालयातील अन्य अधिकाºयांनी खामगाव, शेगाव येथील आयसोलेशन कक्षाची पाहणी केली होती. सोबतच ग्रामीण •ाागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील स्थितीचीही पाहणी केली होती.
संक्रमण रोखण्याचे आव्हान?
बुलडाणा जिल्ह्यात सातत्याने कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यात समुह संक्रमणाचा धोका वाढला आहे. परिणामी केंद्र सरकारच्या दृष्टीने बुलडाणा जिल्हयात दहा पेक्षा अधिक कोरोना बाधीत रुग्ण बुलडाणा जिल्ह्यात आढळल्याने येथे सुक्ष्मस्तरावरही काही उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती आहे.