CoronaVirus in Buldhana : आणखी दोघांचा मृत्यू; ३२ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 11:01 AM2020-07-12T11:01:38+5:302020-07-12T11:01:45+5:30
कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यातील दोन बाधीतांचा मृत्यू झाला असून खामगाव व चिखली येथील हे मृतक आहे
बुलडाणा : कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यातील दोन बाधीतांचा मृत्यू झाला असून खामगाव व चिखली येथील हे मृतक आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यु झालेल्यांची संख्या १७ वर पोहोचली आहे. दुसरीकडे ११ जुलै रोजी ३२ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
यामध्येखामगाव प्रयोग शाळेत तपासणीनंतर १३ तर रॅपीड टेस्टमद्ये १९ जण पॉझिटिव्ह आले आहेत. शनिवारी एकूण ४४३ अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी ४११ अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नांदुरा येथील चार, डोणगाव येथील एक, मलकापूर येथील तीन, मेहकर येथील दोन, खामगावमधील १३, मेहकर तालुक्यातील वडगाव माळी येथील पाच, संग्रामपूर तालुक्यातील सोनाला येथील एक, शेगाव येथील एक तर जानोरी येथील एका बाधीताचा समावेश आहे.
दुसरीकडे उपचारादरम्यान खामगावमधील मस्तान चौकातील ६५ वर्षीय व्यक्ती आणि चिखलीतील रेणुका माता मंदिरा जवळ राहत असलेल्या ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्हचा मृत्यूदर हा ३.८२ टक्क्यावर पोहोचला आहे. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत बुलडामा जिल्ह्याचा मृत्यूदर कमी आहे.
दरम्यान आठ रुग्णांनी शनिवारी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामध्ये शेगाव तालुक्यातील आळसणा येथील पाच, जामठी (धाड) येथील एक आणि चिखली येथील एक व अन्य एका व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत चार हजार ३८१ रिपोर्ट निगेटीव्ह आले असून २३५ रुग्ण बरे झाले आहेत. अद्याप ८७ अहवालांची तपासणी बाकी आहे. जिल्ह्यातील एकूण बाधीतांची संख्या ४४५ झाली आहे. सध्या या पैकी १९३ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी दिली.