CoronaVirus in Buldhana : आणखी दोघांचा मृत्यू ; ३७ पॉझिटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 04:06 PM2020-10-16T16:06:44+5:302020-10-16T16:07:01+5:30
जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून गुरूवारी आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून गुरूवारी आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे. तसेच ३७ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तसेच १५९ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ८ हजार १८५वर पोहचली असून त्यापैकी ७ हजार ७९४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात २७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान हाजी मलंग दर्ग्याजवळ, बुलडाणा येथील ६८ वर्षीय पुरुष व सवणा ता. चिखली येथील ६५ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
प्र्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण २३०अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी १९३ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून ३७ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये बुलडाणा शहरातील चार , बुलडाणा तालुक्यातील डोंगर खंडाळा येथील एक, खामगाव शहरातील एक, खामगाव तालुक्यातील टेंभुर्णा येथील एक, दे. राजा शहरातील तीन, दे. राजा तालुक्यातील नागणगाव येथील एक, दे. मही दोन, लोणार तालुक्यातील रायगाव १, जळगाव जामोद शहरातील एक, चिखली तालुक्यातील दीवठाणा येथील एक , मंगरूळ नवघरे येथील दोन, सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेडा एक, केशव शिवणी २, निमगाव वायाळ ३, नांदुरा शहरातील १० , नांदुरा तालुक्यातील पोटळी १, मलकापूर शहरातील दोन , मलकापुर तालुक्यातील दुधलगाव २, तसेच मूळ पत्ता जालना येथील एका रुग्णाचा समावेश आहे. चिखली येथील १८, चुनावाला हॉस्पिटल येथील २३, मेहकर २०, सिंदखेड राजा २१, खामगाव २, नांदुरा ८, दे. राजा १८, लोणार : १४, शेगाव ३, बुलडाणा अपंग विद्यालय २५, मलकापूर ६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत ११३ कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे.