CoronaVirus in Buldhana : आणखी दोघांचा मृत्यू; ५५ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 11:15 AM2020-07-28T11:15:33+5:302020-07-28T11:15:47+5:30
खामगाव येथील ५२ वर्षीय पुरूष व देऊळगाव राजा येथील ६५ वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात सोमवारी आणखी ५५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान खामगांव येथील ५२ वर्षीय पुरूष व देऊळगाव राजा येथील ६५ वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातून २४१ अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण २९६ अहवाल सोमवारी प्राप्त झाले आहेत. यापैकी २४१ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून ५५ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ४९ व रॅपिड टेस्टमधील सहा अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून १७३ तर रॅपिड टेस्टमधील ६८ अहवालांचा समावेश आहे. पॉझीटीव्ह आलेल्या रुग्णांमध्ये ब्रम्हपुरी ता. चिखली येथील ६० वर्षीय पुरूष, दाताळा ता. मलकापूर येथे ५२ वर्षीय महिला, बुलडाणा तेलगु नगर ७८ वर्षीय पुरूष, डोंगरशेवली ता. चिखली ४८ वर्षीय महिला, देऊळगाव राजा : ४२, २० वर्षीय महिला, १८ वर्षीय पुरूष, जळगांव जामोद ६० व २८ वर्षीय महिला, ३४ वर्षीय पुरूष, नांदुरा येथे १८ वर्षीय तरूणी, ६०, ६५ वर्षीय पुरूष, कृष्णा नगर ७२ वर्षीय पुरूष, मारवाडी गल्ली २५ वर्षीय पुरूष, नांदुरा खुर्द ८५, २० वर्षीय पुरूष, २२ वर्षीय महिला, चांदुर बिस्वा ता. नांदुरा ३० वर्षीय पुरूष, वडनेर ता. नांदुरा येथे ७८ वर्षीय पुरूष, बेलाड ता. नांदुरा येथे २२ वर्षीय महिला पॉझिटिव्ह आढळली आहेत. लोणार तालुक्यातील सुलतानूपर येथे ३५, २७, २५, ५५ वर्षीय पुरूष, ५० वर्षीय महिला, अंचरवाडी ता. चिखली येथे ५२, ५ वर्षीय पुरूष, चिखली येथे ३३ वर्षीय महिला, पिं.राजा ता. खामगांव येथे ५२, २६, ८, ३१, ३५ वर्षीय पुरूष, ७२, ३०, ३१ वर्षीय महिला, शेगांव येथे ७०, ३३, ४२, ३१, ३० वर्षीय पुरूष, ३५, २७, २९, ४५ वर्षीय महिला, सिंदखेड राजा येथे ३२ वर्षीय पुरूष, आडगांव राजा येथे २१, ६८ वर्षीय पुरूष, शेंदुर्जन ५१ वर्षीय पुरूष, ३० वर्षीय महिला, खामगांव येथे भुसावळ चौक ५२ व ३० वर्षीय महिला, जुना धान्य बाजार ७० वर्षीय पुरूष, समन्वय नगर ५३ वर्षीय पुरूष संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत.
शेगावात ८ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
शेगाव : तालुक्यासह शहरात तुरळक लागण झाल्यानंतर आता शेगावातील सईबाई मोटे उपजिल्हा सामान्य रूग्णालयातील सहा आणि आनंद सागर क्वारंटिन सेंटरमधील आरोग्य विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे सोमवारी सकाळी आलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. आता आरोग्य विभागच कोरोनाच्या विळख्यात विळख्यात सापडल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेगाव शहरात आतापर्यंत तुरळकपणे प्रसार झालेल्या कोरोना विषाणूच्या संसर्गाने शनिवारी शहरातील ११ व्यक्तींना बाधित केले. तर सोमवारी सकाळी आलेल्या अहवालांतून शेगाव शहरात खळबळ उडाली. कोरोनाशी दोन हात करणाºया योद्ध्यांनाच त्याचा संसर्ग झाला आहे. त्यामध्ये आठ कर्मचाºयांचा समावेश आहे. आधीच्या म्हणजे, २५ जुलै रोजी शेगाव शहरात ११ रुग्ण पहिल्यांदाच निघाल्याने आरोग्य विभागाची झोप उडाली होती.