CoronaVirus : बुलडाण्यातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 12:09 PM2020-03-21T12:09:18+5:302020-03-21T12:09:34+5:30
शहरातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली.
बुलडाणा: जगाला हादरून सोडणाऱ्या कोरोना विषाणुच्या संसर्ग तिव्र गतीने पसरत आहे. कोरोनाची गती थांबविण्यासाठी केंद्र व राज्य सरकार नागरिकांच्या सुरक्षेसाठी युद्धस्तरावर कार्य करीत आहेत. याचाच एक भाग म्हणुन शुक्रवारी बुलडाणा नगर परिषदेच्या वतीने शहरातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिकांना कोरोना विषाणुच्या संदर्भात माहिती सुद्धा देण्यात आली.
मुख्याधिकारी महेश वाघमोडे व उपमुख्याधिकारी स्वप्निल लघाने यांच्या मार्गदर्शन खाली आरोग्य निरीक्षक सुनिल बेंडवाल यांच्या नेतृत्वात शहरातील मुख्य बसस्थानक, मॉल आदी सार्वजनिक परिसर स्वच्छ करून लिक्वीड टाकुन धुण्यात आले. केंद्र व राज्य सरकार द्वारे कोरोना विषाणुचा संसर्ग थांबविण्यासाठी सर्व प्रकारचे उपाययोजना राबविण्यात येत आहेत. केंद्र पासुन ते ग्रामीण भागा पर्यंत नागरिकांना कोरोना संदर्भात आवश्यक माहिती देवून मार्गदर्शन करण्यात येत आहे. सोबतच गर्दीच्या ठिकाणापासुन नागरिकांनी दूर रहावे, म्हणुन जिल्हाभरात धारा १४४ लागु करण्यात आलेली आहे. या सोबतच शॉपिंग मॉल, सिमेना गृह, शाळा महाविद्यालय, पर्यटन स्थळे, सभास्थळे, धार्मीक स्थळ, धार्मीक व सामाजिक कार्यक्रमांना ३१ मार्च पर्यंत स्थगती देण्याच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी सुचना दिल्या आहेत. नागरिकांच्या सुरक्षेला प्रधान्य देवून नगर परिषदेच्या वतीने शहरातील मुख्य बसस्थानक स्वच्छ करून लिक्वीड टाकुन अग्नीशमनच्या सहायतेने साफ करण्यात आले.
उपस्थित प्रवाशांना कोरोनाला घाबरू नका, सावध रहा व स्वच्छेकडे अधिक बारकाईने लक्ष द्या, असे आवाहन करत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी बुलडाणा नगर परिषद आरोग्य निरीक्षक सुनिल बेंडवाल, पूजा खरात, विजय आराख, पाणी पुरवठा विभागचे राजु आराख आदी सफाई कामगारांची उपस्थित होते.