CoronaVirus : कोरोनामुक्त रुग्ण म्हणाला, ‘डर के आगे जीत है...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 11:28 AM2020-04-27T11:28:43+5:302020-04-27T11:31:37+5:30

सर्व डॉक्टरांच्या सेवाभावी वृत्तीमुळे मी कोरोना या जीवघेण्या आजारातून बाहेर पडलोे.

 CoronaVirus: The corona-free patient said, ‘Their is victory ahead of Fear ...! | CoronaVirus : कोरोनामुक्त रुग्ण म्हणाला, ‘डर के आगे जीत है...!

CoronaVirus : कोरोनामुक्त रुग्ण म्हणाला, ‘डर के आगे जीत है...!

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनामुक्त व्यक्तीशी ‘लोकमत’ने संवाद साधला. त्यांनी रुग्णालयातील १८ दिवसांचा प्रवास उलगडला.इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी माझे स्वागत केले, अशी माहिती देत कोरोनामुक्त व्यक्तीने समाधान व्यक्त केले.

- मनोज पाटील  
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर: शुरूवात को मनमें थोडासा डर था... लेकीन मुझे पता था की, डर के आगे जीत है.... यहॉ के डॉक्टर और नर्सने उपचार के दरम्यान बहोत सहकार्य किया... इसलिये मै शायद आज मौत से लडकर वापस आया हू... अभी ठीक होने के बाद बहुत अच्छा लग रहा है... इसलिये खुश हू... अशा समाधानकारक भावना मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या शहरातील ५० वर्षीय कोरोनामुक्त रुग्णाने व्यक्त केली.
मलकापूर शहरात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. बुलडाणा कोविड रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होता. या उपचारानंतर त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना २५ एप्रिल रोजी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. घरी आल्यावर २६ एप्रिल रोजी या कोरोनामुक्त व्यक्तीशी ‘लोकमत’ने संवाद साधला. भ्रमणध्वनीवरून त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. या संवादादरम्यान त्यांनी रुग्णालयातील १८ दिवसांचा प्रवास उलगडला. सुख-दु:ख मानवी जीवनाच्या दोन बाजू आहेत. जीवन जगताना आप्तेष्टांशी नाते संबंध प्रत्येकालाच जपावे लागतात. अशा वेळी परिस्थिती बिकट होऊन अडचणीही येतात. त्या सांगून येत नाहीत. तशीच अडचण मला आली. अर्थात न कळणारी. त्यामुळे मला कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हावे लागले, तेव्हा कुठे तरी मनात अनामिक भीती निर्माण झालेली होती; पण मी मनात भीतीचा बाऊ होऊ दिला नाही. प्रबळ इच्छाशक्तीने जे होईल ते होईल; पण प्रशासनाला सहकार्य करून उपचार करायचाच असा दृढनिश्चय केला. प्रशासनानेही मला धीर दिला.
सर्व डॉक्टरांच्या सेवाभावी वृत्तीमुळे मी कोरोना या जीवघेण्या आजारातून बाहेर पडलोे. त्यामुळे मी त्यांचा मनापासून आभारी आहे. साक्षात मृत्यूशी झूंज देऊन मी परत येतोय ही माझ्यासह माझ्या आप्तेष्टांकरिता आनंदाची बाब आहे. बुलडाणा येथील कोविड रुग्णालयातील चमूने सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत काळजी घेतली. आजारातून पूर्णपणे बरे झाल्यावर जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यासह उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून मला सुटी दिली. मलकापूर शहरात पोहोचताच उपविभागीय अधिकारी सुनील विंचनकर, तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नाफडे, नायब तहसीलदार प्रवीण घोटकर यासह इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी माझे स्वागत केले, अशी माहिती देत कोरोनामुक्त व्यक्तीने समाधान व्यक्त केले.

Web Title:  CoronaVirus: The corona-free patient said, ‘Their is victory ahead of Fear ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.