CoronaVirus : जळगावात एक डॉक्टर पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 11:52 AM2020-06-20T11:52:54+5:302020-06-20T11:53:10+5:30

रात्री उशिरा एका डॉक्टरचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

CoronaVirus: A doctor positive in Jalgaon | CoronaVirus : जळगावात एक डॉक्टर पॉझिटिव्ह

CoronaVirus : जळगावात एक डॉक्टर पॉझिटिव्ह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव जामोद : शहरातील वाडी खुर्द परिसरातील एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर रात्री उशिरा एका डॉक्टरचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शहरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता चार झाली आहे. ‘त्या’ डॉक्टरच्या कुटुंबीयांसह १४ जणांना शुक्रवारी खामगाव येथे पाठविण्यात आले. त्यामध्ये डॉक्टरच्या परिवारातील ८ सदस्यांसह त्यांच्याकडे काम करणारी मुले व महिला मिळून सहा जण आहेत.
शहरातील एका रूग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या संपर्कातील चार डॉक्टरांसह १६ जणांना खामगाव येथे कोविड रुग्णालयात पाठविण्यात आले. रात्री उशीरा सदर डॉक्टरांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर शुक्रवारी सकाळी महेश नगर व लगतचा परिसर ँँप्रतिबंदीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येवून सील करण्यात आला.
संबंधित डॉक्टर व त्यांचे कुटुंबिय रविवारी शेगाव येथे एका नजीकच्या नातेवाईकाच्या लग्न समारंभात उपस्थित झाले होते. तेथे औरंगाबाद आणि अन्य शहरातील काही मोजकी मंडळी होती. त्यामध्ये या डॉक्टरला कोरोनाचा संसर्ग झाला असावा असा कयास व्यक्त केल्या जात आहे.


शेगावात पुन्हा कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळला

शेगाव : शहरात गत काही दिवसांपासून कोरोनाग्रस्त रुग्ण नसल्याने शहरातील जनजीवन पूर्वपदावर आले होते. मात्र, १८ जून रोजी स्थानिक जोगडी फैलात एक महिला कोरोनाग्रस्त आढळल्यामुळे बाजारपेठेत खळबळ उडाली. अनेकांनी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्यावतीने संबंधित परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात आले. जोगडी फैलातील रहिवासी असलेली महिला ९ जून रोजी अकोला येथून परतली. त्यांच्या वडिलांची प्रकृती ढासळल्याने सदर महिला अकोला येथे गेली होती. परत आल्यानंतर सदर महिलेला सर्दी, हिवताप झाला. महिलेने होमियोपॅथी डॉक्टरकडून उपचार घेतले. दरम्यान त्यांच्यी तपासणी केल्यानंतर खामगाव येथील रुग्णालयात त्यांचा स्वॅब नमुना घेण्यात आला. १८ जून रोजी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे १९ जून रोजी त्यांच्या घरातील ११ सदस्यांना सईबाई मोटे रुग्णालयात तपासणसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण घोंगटे यांनी दिली. ११ जणांमध्ये तीन मुले आहेत. सोबतच परिसरातील आशा वर्कसचीही तपासणी करण्यात येत आहे.

Web Title: CoronaVirus: A doctor positive in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.