CoronaVirus : नांदुरा तालुक्यात चार कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 12:35 PM2020-05-26T12:35:18+5:302020-05-26T13:14:24+5:30
आलमपूर येथे एक तर चांदुरबिस्वा येथे आता तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण झाले आहेत.
नांदुरा: बराच काळ कारोना संसर्गाच्या साथीला नांदुरा तालुक्याने दुर ठेवले होते. मात्र आता नांदुरा तालुक्यातही कोरोना संसर्गाने प्रवेश केला असून तालुक्यातील कोरोना बाधीतांची संख्या आता चार झाली आहे. आलमपूर येथे एक तर चांदुरबिस्वा येथे आता तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण झाले आहेत.
चांदुरबिस्वा येथे पहिल्यांना कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या युवकाची दुसरी बहीणही कोराना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. २५ मे रोजी या युवकाची १६ वर्षीय बहिण पॉझिटिव्ह आढळून आली होती. दरम्यान २५ मे रोजीच रात्री उशिरा जिल्हा आरोग्य विभागास प्राप्त झालेल्या अहवालानुसार चांदुरबिस्वा येथील आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान एकट्या चांदुरबिस्वा येथे आता एकूण तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
जळगाव जामोद तालुक्यातील मृत्यू पावलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या सोबत पुणे जिल्ह्यातील वाघोली येथून चांदुरबिस्वा येथील युवकाने जिल्ह्याकडे परतीचा प्रवास केला होता. दरम्यान, तपासणीमध्ये हा युवक पॉझिटिव्ह आढळून आला होता. दरम्यान, २५ मे रोजी त्याची लहान बहीण व त्यानंतर दुसरी एक बहिणही पॉझिटिव्ह आढळून आली असल्याची माहिती नांदुरा आरोग्य विभागातील सुत्रांनी दिली.