Coronavirus : दुसऱ्या लाटेच्या प्रतिबंधासाठी बुलडाणा जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा सतर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 12:10 PM2020-11-20T12:10:13+5:302020-11-20T12:10:24+5:30
Buldhana CoronaVirus News आरोग्य विभागाने नियोजन केले असून अैाषधीसाठा तथा इंजेक्शनचीही गरजेनुरूप उपलब्धता करण्याची पूर्वतयारी केली आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता पाहता आरोग्य विभागाने आतापासूनच सतर्कता बाळगण्यास प्रारंभ केला असून प्रसंगी १५ ते २० हजार रुग्णांना गरज पडल्यास ऑक्सीजनचा पुरवठा करता येईल या पद्धतीने आरोग्य विभागाने नियोजन केले असून अैाषधीसाठा तथा इंजेक्शनचीही गरजेनुरूप उपलब्धता करण्याची पूर्वतयारी केली आहे.विभागीय आयुक्त पिषुयसिंह यांनी जिल्हाधिकारी कार्यालायत १९ नोव्हेंबर रोजी कोवीड संसर्ग प्रतिबंधासंदर्भाने जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी दुसऱ्या लाटेची शक्यता पाहता आरोग्य यंत्रणेने नेमकी काय पुर्वतयारी केली आहे, याचाही सविस्तर आढावा त्यांनी घेतला. त्यावेळी उपरोक्त माहिती आरोग्य यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांना दिली.
सप्टेंबर महिन्यातील कोरोनाची पहिली लाट महत्त्म पातळीवर पोहोचली होती. त्यावेळी जवळपास १२०० च्या आसापस कोरोना बाधीत होते. सप्टेंबरमधील कोरोनाच्या लाटेदरम्यान असणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत किमान दहा टक्के अधिक रुग्ण वाढू शकतात असा कायस बांधून त्यादृष्टीने यंत्रणांनी गांभिर्यपूर्वक दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर सज्जता ठेवावी, अशा सुचना विभागीय आयुक्तांनी या बैठकीत दिल्या. दम्यान, नोव्हेंबर अखेर आयसीएमआरने केलेल्या भाकीताच्या अनुषंगाने जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या कमी आहे. ही जमेची बाजू असल्याचेही आरोग्य विभागातील सुत्रांनी सांगितले. मात्र पुढील काळात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानुषंगाने कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विषयक पायाभूत सुविधा सध्या उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. ऑक्सीजनचाही मुबलक साठा उपलब्ध असून प्रसंग पडल्यास १५ ते २० हजार रुग्णांना पुरू शकले ऐवढा ऑक्सीजन जिल्ह्याकडे उपलब्ध आहे. अैाषधीसाठा व तत्सम सुविधाही आहेत.