CoronaVirus : मलकापूरात धोका वाढला; आणखी तिघे पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 05:27 PM2020-04-14T17:27:14+5:302020-04-14T17:27:25+5:30
आणखी तिघे व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याने खळबळ निर्माण झाली आहे.
मलकापूर: येथील कोरोना बाधित रुग्णाच्या कुटूंबातील आणखी तिघे व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याने खळबळ निर्माण झाली आहे. वैद्यकीय यंत्रणेने नागरिकांना खबरदारीचा इशारा दिला आहे.
८ एप्रिलरोजी रोजी कोरोना संसर्ग झाल्यावरून आरोग्य विभागाच्या निकषानुसार मलकापूर उपजिल्हा रुग्णालयातून २ रुग्णांना बुलढाणा रेफर करण्यात आले. त्यापैकी एक पॉझिटिव्ह आला. तर दुसºयाच दिवशी नगराध्यक्ष अॅड. हरिष रावळ यांच्यासह अन्य १६ जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयात क्वारंटीन करण्यात आले. या व्यक्तींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले. १४ एप्रिलरोजी नगराध्यक्ष अॅड. हरिश रावळ, डॉ. जी.ओ.जाधव, डॉ. चेतन जाधव देशमुख यांच्यासह १६ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नागरिकांनी सुचनांचे पालन करावे. सध्या मलकापूरात चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याने नागरिकांनी आपल्या घरातच राहून दक्षता घ्यावी. जेणेकरून इतरांना कोरोनाची लागण होणार नाही असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अमोल नाफडे यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)