CoronaVirus : मलकापूर ऑरेंज झोनमध्ये; नागरिकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 11:08 AM2020-04-14T11:08:58+5:302020-04-14T11:09:05+5:30

शासनदरबारी आँरेज झोनमध्ये आल्याने हजारो मलकापूरकर सुखावल्याच चित्र आहे.

CoronaVirus: Malkapur Orange Zone; Reassurance to citizens | CoronaVirus : मलकापूर ऑरेंज झोनमध्ये; नागरिकांना दिलासा

CoronaVirus : मलकापूर ऑरेंज झोनमध्ये; नागरिकांना दिलासा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर: विदर्भाच्या प्रवेशद्वारी कोरोनाग्रस्त आढळला एक, त्याच्या संपर्कात आल्याने क्वारंटीन केले अनेक,मात्र त्यामुळे समस्या निर्माण झाल्या एकशे एक हे वास्तव आहे. आधी केंद्राचे लाँकडाऊन नंतर राज्याचे एरीया सिल ,अर्थात ते जरुरी आहे. मात्र जनता त्रस्त झाली असून शासनदरबारी आँरेज झोनमध्ये आल्याने हजारो मलकापूरकर सुखावल्याच चित्र आहे.
मलकापूरात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर आधीच केंद्राच्या लाँकडाऊन मध्ये वास्तव्य करणाऱ्यांवर राज्याच्या एरीया सिलबंदची पाळी आली. त्या रुग्णाशी संपर्क आल्याने अनेकांना क्वारंटीन करण्यात आले. अर्थात हा निर्णय जनहितार्थच आहे. मात्र दुसरीकडं समस्या विविध प्रकारच्या समस्या वाढल्याने जनता चांगलीच अडचणीत आली. दरम्यान, कोरोनाचा प्रभाव कमी व्हायला हवा यासाठी केंद्र व राज्य शासनाचे युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पण पाहिजे तस यश अद्याप नाही हे वास्तव आहे. काल परवा लाँकडाऊन ३० पर्यंत वाढविण्याची घोषणा राज्य शासनाने केली कदाचित केंद्र शासनही तशीच भूमिका घेवू शकते ही बाब कोरोनाप्रमाने, दैनंदिन जीवना विस्कळीत होण्याच्या धास्तीने जनतेच्या मनात अस्वस्थता पसरविणारी अशीच आहे. दरम्यान लाँकडाऊन पेक्षा स्थानिक स्तरावर एरीया सिल चे शासनाने उचलेले पाऊल एकीकडे नक्कीच जनहितार्थच आहे. मात्र दुसरीकडं जनतेसाठी डोईजड झाले आहे. अशात १५ पेक्षा कमी लोक कोरोनाचे बळी पडल्याच्या निकषांवर राज्य शासनाने बुलढाणा जिल्ह्याचा समावेश आँरेंज झोनमध्ये केला. त्यामुळे शिथिलता येईल आणी पयार्याने आपल्या परिसराचा समावेश त्यात होईल ही बाब हजारो मलकापूरकरांना सुखावणारी अशीच आहे.


उपचाराची बोंबाबेंब...!
कोरोना विषयी आरोग्य विभागाचे काही निकष आहेत.तशी अवस्था असल्यास रुग्णांना बुलढाणा पाठविण्यात येते.जिल्हा सामान्य रुग्णालयात पाणी नाही, जेवण व्यवस्थीत नाही, उपचाराची बोंबाबोंब चव्हाट्यावर आल्याने हि बाब जनतेच्या डोक्याचा ताप वाढविणारी अशीच आहे.

 

Web Title: CoronaVirus: Malkapur Orange Zone; Reassurance to citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.