CoronaVirus : बुलडाणा जिल्ह्यात एकाचा मृत्यू, ५४ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 12:01 IST2020-11-20T12:00:50+5:302020-11-20T12:01:08+5:30
सिंदखेड राजा तालुक्यातील बाळसमुद्र येथील एका ७४ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

CoronaVirus : बुलडाणा जिल्ह्यात एकाचा मृत्यू, ५४ पॉझिटिव्ह
लाेकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड टेस्टचे गुरूवारी ५८५ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ३१ जणांचे अहवाल हे कोरोना बाधीत आढळून आले तर ५३१ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले. दरम्यान, सिंदखेड राजा तालुक्यातील बाळसमुद्र येथील एका ७४ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत मृत्यू पावलेल्यांची संख्या १३३ झाली आहे तर जिल्ह्यात बाधीत रुग्णांची संख्या १०,६६२ वर पोहोचली आहे.
गुरूवारी पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये पिंपळगाव राजा एक, हिंगणा एक, लाखनवाडा एक, खामगाव दोन, सिंदखेड राजा चार, चिखली आठ, भोकर एक, बोरगाव काकडे एक, माकोडी एक, तिघ्रा एक, कोल्ही गवळी एक, मोताळा दोन, बुलडाणा दोन, नांदुरा दोन, जुमडा दोन, देऊळगाव राजा एक, जळगाव जामोद दोन, चिंचोली सांगळे तीन किनगाव जट्टू, एक, लोणार दोन, जळपिंपळगाव चार, महारखेड एक, दुसरबीड एक, धरणगाव दोन, मलकापूर तीन, करमोडा एक, शेगाव तीन या प्रमाणे कोरोना बादीत रुग्ण आहेत. तर सिंदखेड राजा तालुक्यातील बाळ समुद्र येथील ७४ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे बुलडाणा येथील स्त्री रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
दुसरीकडे ३१ जणांनी गुरूवारी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना कोवीड केअर सेंटरमधून सुटी देण्यात आली. सद्या रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जिल्हयात वाढले असून ९५ टक्क्यांच्या आसपास ते आहे.