बुलडाणा जिल्ह्यात काेराेनाचा उद्रेक; ३५० पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 06:23 PM2021-02-22T18:23:33+5:302021-02-22T18:24:15+5:30
CoronaVirus Outbreak in Buldhana साेमवारी जिल्ह्यात काेराेनाचा उद्रेक हाेउन तब्बल ३५० जणांचा अहवाल पाॅझिटीव्ह आला आहे.
बुलडाणा: जिल्ह्यात गत काही दिवसांपासून काेराेना रुग्ण माेठ्या प्रमाणात वाढत आहेत. साेमवारी जिल्ह्यात काेराेनाचा उद्रेक हाेउन तब्बल ३५० जणांचा अहवाल पाॅझिटीव्ह आला आहे. तसेच १०९८ अहवाल निगेटीव्ह असून ९६ जणांनी काेराेनावर मात केली आहे.
पॉझीटीव्ह रुग्णांमध्ये खामगांव शहरातील २१ , खामगांव तालुका माक्ता १, नांदुरा शहर १९, नांदुरा तालुका : वाडी १, निमखेड १, टाकरखेड १, बुलडाणा शहर ५१, बुलडाणा तालुका केसापूर १, भादोला १, तराडखेड १, दहीद बु १, माळवंडी १, सागवन ५, सुंदरखेड २, गिरडा २, टाकळी १, मेहकर शहर १, मेहकर तालुका थार १, डोणगांव २, जानेफळ २, बऱ्हाई २, कुंबेफळ १, दे. राजा तालुका अंढेरा १०, आळंद २, सिनगांव जहागीर १८, भिवगण ८, दे. राजा शहर ४०, सिं. राजा शहर २, सिं. राजा तालुका चिंचोली १, पिंपळखुटा २, दुसरबीड १, चिखली शहर ३३, चिखली तालुका टाकरखेड १, अंचरवाडी १, ईसोली १, पिंपळवाडी ३, हातणी ३, वळती १, अंत्री कोळी ४, जांभोरा ३, गुंज १, मंगरूळ नवघरे ५, केळवद २, धोत्रा भणगोजी २, सवणा ३, पेठ १, तेल्हारा २, पिंपळगांव सोनाळा २, मालखेड १, गजरखेड १, भोरसा भोरसी १, मलकापूर शहर ३७, मलकापूर तालुका पिंपळखुटा १, लासुरा २, जांबुळ धाबा १, कुंड बु २, जळगांव जामोद शहर ०४, जळगांव जामोद तालुका : झाडेगांव ५, मोताळा शहर ७, मोताळा तालुका तळणी १, लोणार तालुका पिंपळनेर १, हिरडव १, लोणार शहर १०, मूळ पत्ता कुऱ्हा काकोडा ता. मुक्ताईनगर जि. जळगांव १, मेरखेडा ता. जाफ्राबाद जि. जालना १, जाळीचा देव ता. भोकरदन जि. जालना १, डोलखेडा जि. जालना येथील एकाचा अहवाल पाॅझिटीव्ह आला आहे.
तसेच काेराेनावर मात केल्याने खामगांव येथील ४ , बुलडाणा सिद्धीविनायक कोविड हॉस्पीटल २, अपंग विद्यालय २४, स्त्री रूग्णालय ३, दे. राजा :९, चिखली १५, लोणार ४, शेगांव १७, जळगांव जामोद ३, मलकापूर ५, मेहकर ९, नांदुरा येथील एकाने काेराेनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे.
१८७ जणांचा मृत्यू
आज रोजी ३ हजार ३३० नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल १ लाख २१ हजार ५२९ आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण १६ हजार ४९६ कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी १४ हजार ६८६ कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात १ हजार ६२३ कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत १८७ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.