CoronaVirus : नांदुऱ्यातील ‘त्या’ मृत महिलेचा अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 05:15 PM2020-05-15T17:15:02+5:302020-05-15T17:15:10+5:30
कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असल्याने नांदुरेकरांना दिलासा मिळाला आहे.
नांदुरा: शहरातील सिंधी कॉलनी परीसरातील त्या मृत महीलेचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असल्याने नांदुरेकरांना दिलासा मिळाला आहे.
१२ मेरोजी बºहाणपूर येथे माहेरी गेलेल्या ६० वर्षीय महिलेला आजारी अवस्थेत नांदुरा येथे आणण्यात आले होते. त्या महिलेची प्रकृती १२ मेरोजी सायंकाळी ७ वाजता ताप आल्याने नांदुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले होते. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी सत्यनाराय जैस्वाल यांनी तपासणी करून पुढील तपासणीसाठी व उपचारासाठी खामगाव येथतील कोविड रुग्णालयात उपचारार्थ रेफर केले होते. तत्काळ महिलेचा स्वॅब नमुना घेवून तपासणीसाठी पाठवला होता. दरम्यान त्याच दिवशी तिचा मृत्यू झाला. यामुळे नांदुरा शहरातील सिंधी कॅम्प सह संपूर्ण शहरामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. १५ मेरोजी या महिलेचा रिपोर्ट प्राप्त झाला असून निगेटिव्ह आल्याची माहिती यंत्रणेने दिली. खबरदारी म्हणून नांदुरा शहरातील व तालुक्यातील नागरिकांनी कोरोना आजराविषयी नियमाचे काटेकोर पालन करावे व आपलं शहर व तालुका सुरक्षित ठेवून सतर्कता बाळगावी असे आवाहन तहसिलदार राहूल तायडे यांनी केले आहे.
(शहर प्रतिनिधी)