CoronaVirus : जळगाव जामोद येथील ११ जणांचे अहवाल निगेटिव्ह; रुग्णालयातून सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 11:00 AM2020-05-15T11:00:51+5:302020-05-15T11:01:14+5:30

जळगावकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

CoronaVirus: Reports of 11 people in Jamod are negative; Hospital leave | CoronaVirus : जळगाव जामोद येथील ११ जणांचे अहवाल निगेटिव्ह; रुग्णालयातून सुटी

CoronaVirus : जळगाव जामोद येथील ११ जणांचे अहवाल निगेटिव्ह; रुग्णालयातून सुटी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जळगाव जामोद येथील आणखी ११ जणांच्या स्वॅब नमुन्यांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे जळगावकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. १३ मे रोजी सकाळी कोरोना पॉझीटव्ह आलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील सात जणांचेही अहवाल निगेटीव्ह आले होते. त्यानंतर १३ मे रोजी रात्री उर्वरित ११ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले. त्यामुळे तणावाखाली असलेल्या जुन्या जळगाव मधील नागरिकांना एक मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, १३ मे रोजी रात्री उशिरा ११ संदिग्ध रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह आले होते. त्यांना १४ मे रोजी वैद्यकीय प्रोटोकॉल पाळत खामगाव येथील आयसोलेशन कक्षातून सुटी देण्यात आली आहे. १४ मे रोजी दुपारी हे सर्व ११ जण जळगाव जामोद येथे पोहेचले आहेत.
नऊ मे रोजी बºहाणपुर येथील एका अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमातून परतलेल्या फळ विक्रेत्याचा कोरोना संसर्गाचा अहवाल पॉझीटीव्ह आला होता. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून जवळपास १८ जणांना क्वारंटीन करण्यात आले होते. सोबतच त्यांना खामगाव येथील आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले होते. या १८ जणांचे ११ मे रोजी स्वॅब घेण्यात येऊन ते अकोला येथील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. १३ मे रोजी त्यातील सात जणांचे अहवाल निगेटीव्ह आले होते. त्यांना १३ मे रोजीच सकाळी सुटी देण्यात आली होती तर उर्वरित ११ जणांच्या अहवालाची प्रतीक्षा होती. त्यांचेही अहवाल १३ मे रोजी रात्री उशिरा आरोग्य विभागास प्राप्त झाले. त्यामुळे त्यांना १४ मे रोजी सकाळी खामगाव येथील आयसोलेशन कक्षातून सुटी देण्यात आली.
दुसरीकडे, जळगाव जामोद येथील जुन्या गावातील बालाजीनगर सह लगतचा भाग हा रेड झोन घोषित करण्यात आला असून त्याच्या दोन किमी परिघातील भाग हा बफर झोन असल्याचे निर्देशीत केलेले आहे. सध्या सुमारे सव्वा दोन हजार नागरिक हे जळगाव जामोद मधील रेड झोनमध्ये वास्तव्यास असून त्यांचे नियमित स्वरुपात आरोग्य विषयक सर्व्हेक्षण सुरू आहे. दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यात सध्या प्रतिबंधीत क्षेत्रात ३५ हजार ३१७ व्यक्ती वास्तव्यास असून त्यांचे १६९ पथकाद्वारे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. या क्षेत्रात एकूण ७ हजार ६६ घरे आहेत. जळगाव जामोद मधील संदिग्ध १८ रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह आल्यामुळे जळगावकरांना दिलासा मिळाला आहे.

‘त्या’ आरोग्य सेवकाचा अहवालही आला निगेटीव्ह
कोरोना संसर्ग झालेल्या जालना जिल्ह्यातील आपल्या पत्नीस भेटण्यास गेलेल्या घाटाखालील आरोग्य सेवकाचाही अहवाल निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे क्वारंटीन असलेल्या नऊ जणांना दिलासा मिळाला आहे.


नांदुरेकरांचा जीव टांगणीला!
नांदुऱ्यातील ६४ वर्षीय कोरोना संदिग्ध वृद्ध महिलेचा १२ मे रोजी खामगाव येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या महिलेच्या पार्थिवावर नांदुरा येथे १३ मे रोजी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले होते. या मृत महिलेचा घेण्यात आलेल्या स्वॅब नमुन्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यामुळे नांदुºयातील नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे.

 

 

Web Title: CoronaVirus: Reports of 11 people in Jamod are negative; Hospital leave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.