CoronaVirus : आणखी सात पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ७०३
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 11:06 AM2020-07-19T11:06:04+5:302020-07-19T11:07:06+5:30
जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या आता ७०३ झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या आता ७०३ झाली आहे. दरम्यान, शनिवारी सात जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. शनिवारी प्राप्त झालेल्या ३५ अहवालांपैकी २९ अहवाल निगेटीव्ह आले आहे. तर कोरोनावर मात करणाऱ्या १६ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील पाच व रॅपीड टेस्टमध्ये मध्ये दोन जण पॉझिटिव्ह आले. पॉझिटिव्ह आलेले सातही रुग्ण हे खामगाव तालुक्यातील असून यातील सहा रुग्ण हे खामगाव शहरातील असून एक रुग्ण हा पिंपळगाव राजा गावातील आहे.
दरम्यान, १६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यात पिंपळगाव राजा येथील एक, नांदुरा शहरातील तीन, खामगाव शहरातील नऊ आणि मलकापूर शहरातील तीन व्यक्तींचा समावेश आहे. खामगावातील जलालपुरा, गांधी चौक, केलानगर, अमृत बाग येथील व्यक्तींचा यात समावेश आहे. मलकापूरमधील सिवाजीनगर, मंगलगेट परिसरातील तीन व्यक्ती कोरोना मुक्त झाले आहेत.
आतापयंत जिल्ह्यात आठ हजार ५७२ व्यक्तींचे कोरोना अहवाल निगेटीव्ह आलेले आहेत. तर ३२६ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. अद्याप २५३ अहवालांची प्रतीक्षा ्सून त्यांचे अहवाल प्रसंगी १९ जुलै रोजी मिळण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांची संख्या ७०३ वर पोहेचली आहे. दुसरीकडे रुग्णालयामध्ये ३५७ रुग्णांवर सध्या उपचार करण्यात येत असून मृत्यू पावलेल्या कोरोना बाधीतांची संख्या २० वर पोहोचली आहे. यात सर्वाधिक मृत्यू हे मलकापूर तालुक्यात झाले आहे. रुग्णालयामद्ये सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांपैकी तीन जण आॅक्सीजनवर आहे तर चार रुग्णांनी उपचारासाठी अकोल्याला पसंती दिली आहे. तशी नोंदही आरोग्य विभागाने केली असल्याची माहिती सुत्रांनी दिली.