CoronaVirus : बाधीत ७५ रुग्ण गंभीर; सहा व्हेंटीलेटरवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 11:55 AM2020-09-26T11:55:27+5:302020-09-26T11:58:40+5:30
बुलडाणा, खामगाव, देऊळगाव राजा आणि शेगाव या चार ठिकाणच्या कोवीड डेडिकेटेड हॉस्पीटलमध्ये सध्या या रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात अॅक्टीव्ह कोरोना बाधीत रुग्णांपैकी ७५ जण गंभीर असून त्यापैकी सहा रुग्ण हे व्हेंटीलेटरवर असल्याची माहिती २५ सप्टेंबर रोजी समोर आली आहे. गेल्या आठवड्यातही ४७ रुग्ण गंभीर होते. त्यापैकी काहींच्या प्रकृतित सुधारणा झाली असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
बुलडाणा जिल्ह्यात प्रामुख्याने बुलडाणा, खामगाव, देऊळगाव राजा आणि शेगाव या चार ठिकाणच्या कोवीड डेडिकेटेड हॉस्पीटलमध्ये सध्या या रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातही आॅक्सीजनची सुविधा असली तरी अद्याप हे केंद्र कार्यान्वीत झालेले नाही. त्यामुळे प्रामुख्याने आॅक्सीजनची गरज असलेल्या रुग्णांना बुलडाणा, खामगाव, शेगाव आणि देऊळगाव राजा येथील कोवीड रुग्णालयावर मदार आहे. त्यामुळे येत्या काळात कोरोना बाधीत रुग्णांची संभाव्य वाढणारी संख्या पाहता मलकापूर येथेही आॅक्सीजनची सुविधा उपलब्ध करण्याची करण्याची गरज निर्माण झाली आहे. २५ सप्टेंबर रोजी आयसीयू बाहेर ५१ बाधीत रुग्ण आॅक्सीजनवर असून आयसीयूमध्ये १८ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. दुसरीकडे व्हेंटीलेटरवर सहा रुग्ण आहे. गेल्या आठवड्यात कोरोना बाधीत व गंभीर असलेल्या रुग्णांपैकी काही रुग्णांच्या प्रकृती सुधारणा झाल्याचे दिलासादायक चित्र आहे.
लिक्वीड आॅक्सीजन टँक उभारणीच्या हालचाली
बुलडाणा येथील डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटलमध्ये २० केएल क्षमतेचा लिक्वीड आॅक्सीजनचा टँक उभारण्यात येणार आहे. त्यास पुर्वीच मान्यता देण्यात आली आहे. सोबतच सोबतच २५ ड्युरा सिलेंडर खरेदीची प्रक्रियेने आता वेग घेतला आहे. प्रामुख्याने ड्युरा सिलेंरमध्ये लिक्वीड आॅक्सजीन असतो. तो २० केएल क्षमतेच्या टँकसाठी उपयुक्त ठरले. या व्यतिरिक्त आॅक्सीजन सिलीडंरचे रोटेशनही प्रभावीपणे व्हावे, यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील सिलींडरची संख्याही वाढविण्यात येत आहे.