CoronaVirus : बुलडाणा जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू; ११३ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2020 12:39 PM2020-10-04T12:39:44+5:302020-10-04T12:41:24+5:30

CoronaVirus in Buldhana आतापर्यंत जिल्ह्यात ९९ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

CoronaVirus: Two more died in Buldana district; 113 Positive | CoronaVirus : बुलडाणा जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू; ११३ पॉझिटिव्ह

CoronaVirus : बुलडाणा जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू; ११३ पॉझिटिव्ह

googlenewsNext
ठळक मुद्देमेहकर येथील ५० वर्षीय महिला व नांदुरा येथील ५७ वर्षाच्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. जिल्ह्याचा कोरोना मृत्यूदर १.३१ आहे.बरे होण्याचे प्रमाण ८५ टक्क्यांच्या आसपास आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: कोरोना बाधीतांच्या संख्येत शनिवारी ११३ जणांची भर पडली असून एकूण बाधीतांची संख्या आता ७,५१० झाली आहे. दरम्यान, मेहकर व नांदुरा येथील प्रत्येकी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत जिल्ह्यात ९९ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
शनिवारी प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविम्यात आलेल्या व रॅपीड टेस्टमध्ये तपासण्यात आलेल्या ५४० जणांचे अहवाल प्राप्त झाले. पैकी ११३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये लोणार एक, पाडळी शिंदे एक, सावरगाव मुंढे दोन, पळसखेड सहा, रायगाव एक, मांडवा एक, सुलतानपूर एक, मेहकर चार, पिंप्री माळी एक, कळंबेश्वर एक, मोळा एक, डोणगाव एक, पिंपळगाव सोनारा एक, पिंपळखुटा एक, दुसरबीड दोन, सिंदखेड राजा एक, दे. मही तीन, सातेगाव एक, नागणगाव दोन, पिंपलखुटा एक, रोहणा तीन, दे. राजा तीन, पेठ दोन, सवणा दोन, मेरा बु. एक, करतवाडी दोन, चिखली सहा, माळवांडी एक, ढासाळवाडी एक, दत्तपु एक, धामणगाव एक, बुलडाणा २१, मलकापूर तीन, भाडगणी एक, धरणगाव एक, धा. बढे एक, बोराखेडी तीन, रोहिणखेड एक, शेलापुर तीन, शेगाव दोन, जवळपा एक, खामगाव सात, शिरसगाव देशमुख दोन, नांदुरा दहा अआणि अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील एकाचा यामध्ये समावेश आहे.
दरम्यान मेहकर येथील ५० वर्षीय महिला व नांदुरा येथील ५७ वर्षाच्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दुसरीकडे १६१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये बुलडाणा कोवीड केअर सेंटरमधील ४५, मोताळा दोन, खामगाव ३२, देऊळगाव राजा १५, चिखली एक, मेहकर एक, मलकापूर आठ, नांदुरा तीन, लोणार २०, शेगाव २४, जळगाव जामोदमधील दहा जण कोरोना मुक्त झाले.
दुसरीकडे जिल्ह्यात ९९ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. सध्या जिल्ह्याचा कोरोना मृत्यूदर १.३१ असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५ टक्क्यांच्या आसपास असल्याचे चित्र आहे.

 

 

 

Web Title: CoronaVirus: Two more died in Buldana district; 113 Positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.