CoronaVirus : बुलडाणा जिल्ह्यात आणखी दोन महिलांचा मृत्यू ; ४४ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 10:37 AM2020-07-17T10:37:33+5:302020-07-17T10:39:44+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २० झाली आहे.

CoronaVirus: Two more women die; 44 Positive | CoronaVirus : बुलडाणा जिल्ह्यात आणखी दोन महिलांचा मृत्यू ; ४४ पॉझिटिव्ह

CoronaVirus : बुलडाणा जिल्ह्यात आणखी दोन महिलांचा मृत्यू ; ४४ पॉझिटिव्ह

Next
ठळक मुद्देखामगाव येथील दोन महिलांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.गुरूवारी तब्बल ४४ जण कोरोना बाधीत आढळून आले.


लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात कोरोना बाधीतांचा आकडा सातत्याने वाढत असून गुरूवारीही तब्बल ४४ जण कोरोना बाधीत आढळून आले आहेत. प्रयोग शाळेकडून प्राप्त २८० अहवालांपैकी २३६ अहवाल निगेटीव्ह आले आहेत. दरम्यान, खामगाव येथील दोन महिलांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २० झाली आहे. जिल्ह्यात सध्या ३५२ कोरोनाबाधीतांवर ुउपचार करण्यात येत असून एकूण रुग्ण संख्या ६६९ झाली आहे.
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये खामगाव १३, देऊळगाव राजा ११, जळगाव जामोद एक, शेगाव चार, बुलडाणा एक, नांदुरा दोन, वडगाव माळी सहा आणि मलकापूर पाच याप्रमाणे ४४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. देऊळगाव राजा येथे आढळून आलेला एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हा मुळचा जालना जिल्ह्यातील शिपोरा येथील आहे.
खामगाव येथील ५० व ५५ वर्षीय महिलांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे खामगाव तालुक्यात कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. दुसरीकडे गुरुवारी १२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये साखरखेर्डा येथील दोन, देऊळगाव राजा तालुक्यातील सात जण, खामगावमधील जलालपुरा भागातील दोन, बुलडाण्यातील एका ३७ वर्षी महिलेचा समावेश आहे.
दरम्यान, आजपर्यंत पाच हजार ५७५ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. सोबतच २९७ कोरोना संक्रमीत लोकांनी कोरोनावर मात केली आहे. अद्याप जिल्ह्यात ४१ संदिग्ध रुग्णांच्या अहवालाची प्रतीक्षा असून जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ६६९ झाली आहे. सध्या ३५२ बाधीतांवर उपचार करण्यात येत आहेत.

Web Title: CoronaVirus: Two more women die; 44 Positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.