CoronaVirus : मलकापुरात कोरोनाचे दोन नवे रूग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 11:12 AM2020-05-30T11:12:52+5:302020-05-30T11:13:06+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या आता ५५ वर पोहोचली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : बुलडाणा जिल्ह्यात १९ अहवाल निगेटिव्ह आल्याचे समाधान औट घटकेचे ठरत, मलकापूर येथील दोन रूग्ण कोरोन पॉझिटिव्ह आढळल्यामुळे जिल्हा पुन्हा खळबळ उडाली. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या आता ५५ वर पोहोचली आहे.
मलकापूर येथील पॉझिटिव्ह आलेल्या अकाउंटंटच्या संपर्कातील एक व्यक्ती ही शहरातील एका डॉक्टरांच्या घरी कार्यरत होती. दरम्यान, मलकापूर संबंधित दोन्ही डॉक्टर सुध्दा पॉझिटिव्ह आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. निवासी डॉ. रामेश्वर पुरी यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. दुसरीकडे दुपारी प्राप्त झालेले १९ अहवाल निगेटिव्ह आल्याने व खामगाव कोविड केअर सेंटर मधील तीन रूग्ण कोरोनामुक्त झाल्याने जिल्ह्याला दिलासा मिळाला होता. मात्र, हा दिलासा औट घटकेचाच ठरला आहे. दरम्यान, परजिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींमुळे जिल्ह्यातील २२ व्यक्ती संक्रमित झाल्याची माहिती समोर येत आहे.
(तालुका प्रतिनिधी)