सावरगाव तेली येथे दलित समाज ओट्याच्या बांधकामात भ्रष्टाचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:37 AM2021-09-18T04:37:38+5:302021-09-18T04:37:38+5:30
सावरगाव तेली येथील दलित समाज ओट्याचे बांधकाम सन २०२० मध्ये करण्यात आले. या बांधकामावर २ लाख ४९ हजार ...
सावरगाव तेली येथील दलित समाज ओट्याचे बांधकाम सन २०२० मध्ये करण्यात आले. या बांधकामावर २ लाख ४९ हजार ५९९ रु. खर्च दाखवण्यात आला असून, हे बांधकाम अर्धवट स्थितीत असल्यामुळे या बांधकामाची तक्रार ऑल इंडिया पँथर सेनेचे लोणार तालुकाध्यक्ष अमित काकडे यांनी ७ सप्टेंबर रोजी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली होती. दलित वस्तीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर ओटा बांधकाम व इतर कामामध्ये सरपंच, सचिव यांनी संगनमताने भ्रष्टाचार केला असून, अर्धवट स्थितीत ओटा बांधकाम केल्याने संबंधित सरपंच, सचिव यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, अन्यथा १५ सप्टेंबरपासून पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. तरीसुद्धा पंचायत समिती प्रशासनाने कुठल्याच प्रकारे कारवाई केली नसल्यामुळे सावरगाव तेली येथील ग्रामस्थांसह ऑल इंडिया पँथर सेनेचे तालुकाध्याक्ष अमित काकडे यांनी आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे. आज या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. सावरगाव तेली येथील गावकरी यांनी ८ फेब्रुवारी २०२१ रोजी याबाबतीत गणेश कृपा राठोडसह इतरांनी तक्रार दाखल केली असता या तक्रारीचा अहवाल ३१ मार्च २०२१ रोजी गटविकास अधिकारी लोणार यांनी दिला असता अहवालामधे १६ क्रमांकाच्या मुद्यामधे स्पष्ट नमूद आहे की, प्रमाणक क्र. ८ वर ८ जून २०२० रोजी धनादेश क्र.०६७३२० व्दारे नमुना नं.१९ प्रमाणे ३०,००० रुपये एवढी रक्कम ओटा बांधकामावर खर्ची टाकल्याचे दिसून आले.