निमखेड येथील बांधकामात भ्रष्टाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 12:05 AM2017-08-05T00:05:28+5:302017-08-05T00:07:34+5:30

सिंदखेडराजा : शहरातील घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी  १४ व्या वित्त आयोगामधून ७९ लाख ३६ हजार ३७१ रुपये  खर्च करुन शहरापासून पाच किलोमिटर अंतरावर निमखेड  शिवारात बांधकाम सुरु आहे. सदर कामे नगर परिषदेच्या  बांधकाम विभागाच्या अधिकारी व ठेकेदारांच्या संगनमताने  निकृष्ट दर्जाचे होत आहे. त्या कामाची वरिष्ठ अधिकार्‍यांमार्फ त चौकशी करावी, अशी मागणी नगर परिषद सदस्या तथा माजी  न.प. अध्यक्षा नंदाताई विष्णू मेहेत्रे यांनी निवेदनाद्वारे मु ख्याधिकारी यांचेकडे २१ जुलै रोजी विशेष सभेत केली.

Corruption in the construction of Nimkhed | निमखेड येथील बांधकामात भ्रष्टाचार

निमखेड येथील बांधकामात भ्रष्टाचार

Next
ठळक मुद्दे घनकचरा व्यवस्थापनअंतर्गंत निकृष्ठ काम नंदाताई मेहेत्रे यांची चौकशीची मागणी 

लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा : शहरातील घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी  १४ व्या वित्त आयोगामधून ७९ लाख ३६ हजार ३७१ रुपये  खर्च करुन शहरापासून पाच किलोमिटर अंतरावर निमखेड  शिवारात बांधकाम सुरु आहे. सदर कामे नगर परिषदेच्या  बांधकाम विभागाच्या अधिकारी व ठेकेदारांच्या संगनमताने  निकृष्ट दर्जाचे होत आहे. त्या कामाची वरिष्ठ अधिकार्‍यांमार्फ त चौकशी करावी, अशी मागणी नगर परिषद सदस्या तथा माजी  न.प. अध्यक्षा नंदाताई विष्णू मेहेत्रे यांनी निवेदनाद्वारे मु ख्याधिकारी यांचेकडे २१ जुलै रोजी विशेष सभेत केली.
घनकचरा व्यवस्थापन स्थळाभोवती संरक्षण भिंतीच्या  बांधकामासाठी १९ लाख ४५ हजार ६९२ रुपये मंजूर झाले.  सदर बांधकाम करताना माती मिश्रीत रेतीचा वापर करुन हल क्या प्रतीच्या सिमेंटचा वापर केला आहे. 
बांधकामावर पाणी मारण्यात न आल्यामुळे बांधकाम निकृष्ट  दर्जाचे होत आहे. कंपोस्ट पीटस तयार करण्यासाठी २0 लाख  १३ हजार ५ रुपये मंजूर असून सदर बांधकामात हलक्या प्र तीच्या कच्च्या विटा, निकृष्ट सिमेंट व माती मिश्रीत रेती वा परण्यात येत आहे. तर अंतर्गत रस्ते बांधताना काळी माती  टाकून त्यावर डब्बर व गिट्टी टाकण्याऐवजी काळ्या मातीवर  मुरुम टाकण्यात आला. हा सर्व प्रकार बांधकाम खात्याच्या  अधिकार्‍यांच्या संगनमताने सुरु आहे. असे निकृष्ट काम करुन  लाखो रुपयाचा भ्रष्टाचार होत आहे, याची वरिष्ठ  अधिकार्‍यांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी नंदाताई मेहेत्रे  यांनी केली आहे.

बांधकामाचा दर्जा सुधारण्यासाठी ठेकेदाराला पत्र दिले आहे.  सुधारणा झाली नाही तर सदर ठेकेदाराकडील काम काढून  घेण्यात येईल.
- धनश्री शिंदे, मुख्याधिकारी, सिंदखेडराजा.

Web Title: Corruption in the construction of Nimkhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.