मालवाहतुकीचा खर्च वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:22 AM2021-07-12T04:22:12+5:302021-07-12T04:22:12+5:30
पुनर्वसन व भूसंपादनाला प्राधान्य बुलडाणा : जिगाव प्रकल्प वेोत पूर्णत्वास जाण्यासाठी भूसंपादनाची तथा पुनर्वसनाची कामे प्रकल्पाच्या कामासोबतच समांतर पातळीवर ...
पुनर्वसन व भूसंपादनाला प्राधान्य
बुलडाणा : जिगाव प्रकल्प वेोत पूर्णत्वास जाण्यासाठी भूसंपादनाची तथा पुनर्वसनाची कामे प्रकल्पाच्या कामासोबतच समांतर पातळीवर होणे आवश्यक आहे. प्रकल्पांतर्गत ४७ गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. पहिल्या टप्प्यातील २२ गावांच्या पुनर्वसनासाठी प्राधान्यक्रम ठरविणे आवश्यक आहे. सध्या या गावातील नागरी सुविधा उपलब्ध करण्याला प्राधान्य अपेक्षित आहे.
शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न
बुलडाणा : शहरातून गेलेल्या सर्क्युलर रोडचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. हा सिमेंटचा रस्ता होत असून, याचे काम संथगतीने होत असल्याने वाहनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न सध्या कायमच आहे
बचत गटातील महिला अडचणीत
बुलडाणा : जिल्ह्यात बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी अनेक उद्योग उभारले आहेत. त्यामुळे त्यांना आर्थिक आधार होतो; परंतु बचत गटांना कर्ज देण्यास बँकांनी हात आखडता घेतल्याने बचत गटातील महिलांना अडचणी येत आहेत.
मेहकर तालुक्यात एक पॉझिटिव्ह
मेहकर : येथे शनिवारी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे; परंतु इतर तालुक्यांच्या तुलनेत मेहकरमध्ये रोज रुग्ण सापडतच आहेत.