कापूस, सोयाबीन पिकांच्या उत्पादनात घट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 12:15 AM2017-10-31T00:15:41+5:302017-10-31T00:16:17+5:30

संग्रामपूर: तालुक्यातील एकलारा बानोदा, बावनबीर व एकलारा  या गावात सन २0१७-१८ या खरीप हंगामात अनियमित पाऊस  व कीड रोगराईमुळे सोयाबीन व कापूस या पिकात कमालीची  घट झाली.

Cotton and soybean crops fall in production! | कापूस, सोयाबीन पिकांच्या उत्पादनात घट!

कापूस, सोयाबीन पिकांच्या उत्पादनात घट!

Next
ठळक मुद्देपैसेवारी कमी करण्यात यावी शेतकर्‍यांची तहसीलदारांकडे  मागणी 

लोकमत न्यूज नेटवर्क
संग्रामपूर: तालुक्यातील एकलारा बानोदा, बावनबीर व एकलारा  या गावात सन २0१७-१८ या खरीप हंगामात अनियमित पाऊस  व कीड रोगराईमुळे सोयाबीन व कापूस या पिकात कमालीची  घट झाली. त्यामुळे संबंधित विभागाकडून आणेवारी कमी  करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन एकलारा, बावनबीर व  उमरा गावातील शेतकर्‍यांनी तहसीलदार राठोड यांच्याकडे ३0  ऑक्टोबर रोजी दिले.
सदर दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, सोयाबीन व कापूस  िपकाच्या उत्पादनात कमालीची घट झाली असून, सोयाबीन प्रति  एकर १ ते २ क्विंटल व कापूस प्रति एकर २ ते ४ क्विंटल एवढे  कमी उत्पादन होत आहे. या पिकाला शेतकर्‍यांना भला मोठा  खर्च आला आहे. कापसाला ३ हजार ते ३ हजार ५00 रुपये व  सोयाबीनला १,५00 ते २,३00 रुपये भाव मिळत आहे. शे तकर्‍यांचा झालेला खर्चसुद्धा वसूल न होण्याची स्थिती निर्माण  झालेली आहे. 
सदर उत्पादनात झालेल्या घटीमुळे शेतकर्‍यांसमोर फार मोठे  संकट उभे झाले आहे. सोयाबीन सोंगणी १,५00 ते २,000  एकरी व कापूस ७ रुपये ते १0 रुपये प्रतिकिलो अशी मजुरी  द्यावी लागत आहे. सोयाबीन या पिकाचा काढणी खर्चसुद्धा  वसूल होत नसून, शेतकर्‍यांनी पिकात ट्रॅक्टर घातले आहे.  त्यामुळे संबंधित विभागाकडून आणेवारी कमी करण्यात यावी व  सदर पिकांचा सर्व्हे करून शेतकर्‍यांना पीक विम्याची नुकसान  भरपाईची शिफारस करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे  करण्यात आली आहे. 


शेतकर्‍यांना मदत द्या 
तालुक्यात सोयाबीन व कापूस या पिकांचे उत्पादन कमी झाले  असून, भावसुद्धा मिळेनासा झाला आहे. कमी भावापेक्षा कमी  भावाने खरेदी होत असल्याने शेतकरी पुरता नागवला गेला आहे.  त्यामुळे शासनाने याबाबत सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शे तकर्‍यांना आर्थिक मदतीचा हात देणे गरजेचे बनले आहे. तरी  संबंधित लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन सदर बाबीसाठी  शासनदरबारी पाठपुरावा करावा, अशी मागणी होत आहे.

Web Title: Cotton and soybean crops fall in production!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी