शासकीय खरेदी केंद्र बंद असल्याने कापूस घरात पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 04:39 PM2020-11-10T16:39:34+5:302020-11-10T16:40:08+5:30
Khamgaon News शासकीय खरेदी केंद्र अद्यापही सुरून झाल्याने कापसाची खरेदी मोठ्या प्रमाणात रखडली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : तालुक्यात कापसाची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली. कापूस वेचणीला महिन्यापासून प्रारंभ झाला. मोठ्या प्रमाणात कापसाची वेचणी होऊन कापूस शेतकºयांच्या घरात येऊन पडला आहे. मात्र, कापूस खरेदीसाठी शासकीय खरेदी केंद्र अद्यापही सुरून झाल्याने कापसाची खरेदी मोठ्या प्रमाणात रखडली आहे.
या परिस्थितीचा गैरफायदा अनेक व्यापारी घेत असून, कमी भावाने कापसाची विक्री शेतकºयांना करावी लागत आहे. याचा मोठा फटका शेतकºयांना निमूटपणे सहन करावा लागत आहे. तालुक्यात कापसाचा पेरा मोठ्या प्रमाणात झाला. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने कापूसही चांगला बहरला. गेल्या महिनाभरापासून कापसाची वेचणी सुरू झाली आहे. मध्यंतरी परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात कापूस भिजल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. मात्र, पुन्हा पाऊस उघडल्यानंतर कापूस वेचणी जोमाने सुरू झाली. आता कापासाची वेचणी होऊन मोठ्या प्रमाणात कापूस शेतकºयांकडे उपलब्ध आहे. मात्र, अद्यापही शासनाचे कापूस खरेदी केंद्र सुरू झालेले नाही.
कापसाची ऑनलाईन नोंदणीही सुरू झालेली नाही. वेचून ठेवलेला कापूस दिवाळी सणासाठी शेतकऱ्यांना हातभार ठरतो. जर शासनाने दिवाळीपूर्वीच कापूस खरेदी केली असती, तर शेतकऱ्यांना कापसाचे पैसे दिवाळीसाठी मिळाले असते व शेतकºयांची दिवाळी गोड झाली असती. मात्र,शासनाने खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी उशीर केल्याने मोठ्या प्रमाणात कापूस घरातच पडून आहे. दिवाळी सणाच्या पाश्वभूमीवर अनेक शेतकºयांनी आपला कापूस पडत्या भावाने व्यापाºयांना कमी भावाने विकला. शेतकºयांना याचा आर्थिक फटका बसला आहे. खरेदी केंद्र सुरू होणार नाही. तोपर्यंत 'दलालांचं चांगभलं अशी स्थिती राहणार आहे.